Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईची हवा मध्यम श्रेणीत ; थंडीची अजूनही प्रतीक्षा

मुंबई : मुंबई शहराला मंगळवारी सकाळी हलक्या धुक्याने वेढल्याचे दिसून आले. तसेच शहरातील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली आहे. समीर पनुसार

अ‍ॅड.माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी अनावरण
मुळा नदीवरील मानोरी केंदळ पुल पावसामुळे कोसळला
Bhivandi : बॉयफ्रेण्डसोबत राहण्यासाठी पतीच्या हत्येची सुपारी l LokNews24

मुंबई : मुंबई शहराला मंगळवारी सकाळी हलक्या धुक्याने वेढल्याचे दिसून आले. तसेच शहरातील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली आहे. समीर पनुसार, मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक मंगळवारी सकाळी 10 वाजता 136 इतका होता. तसेच यामध्ये पीएम 10 च्या धूलिकणांची मात्रा अधिक असल्याचे निदर्शनास आले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर पनुसार, बोरिवली, वरळी आणि मुलुंडमधील हवा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे 93, 93 आणि 89 इतका होता. म्हणजेच येथे समाधानकारक हवेची गुणवत्ता नोंदली आहे. दरम्यान, शिवाजी नगरसह कुलाबा, शिवडी येथे हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत नोंदली गेली आहे. शिवाजी नगर येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 217, शिवडीचा 250, तर कुलाब्याचा 251 इतका होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक 0-50 दरम्यान चांगले, 51-100 दरम्यान समाधानकारक, 101-200 दरम्यान मध्यम, 201-300 दरम्यान वाईट, 301-400 दरम्यान अत्यंत वाईट आणि 400 पेक्षा जास्त म्हणजे हवेची गुणवत्ता अतिधोकादायक समजली जाते. भारतीय हवामान विभागाकडून मुंबई शहर आणि उपनगरासाठी दैनंदिन अंदाजामध्ये सकाळी धुके पडण्याची शक्यता आणि मुख्यतः निरभ्र आकाश असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर, किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या हलक्या पावसाच्या अंदाजामुळे तमिळनाडूला मोठा दिलासा मिळाला आहे. मिचाँग चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश तसेच तमिळनाडूत मुसळधार पाऊस झाला. विवध दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत राहील. मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी उत्तर-किनारपट्टी आणि लगतच्या दक्षिण-किनारी आंध्र प्रदेशात एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे समांतर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या जवळ सरकण्याची शक्यता आहे आणि नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

COMMENTS