Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई पोलिस भरतीची 23 जुलै रोजी लेखी परीक्षा

मुंबई : सशस्त्र पोलीस शिपाई भरती -2021 शारीरिक चाचणी मधील 2 हजार 562 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार

*मेहुणीवर अत्याचार करून नंतर पाच जणांची हत्या l DAINIK LOKMNTHAN*
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथी महिलांनी केली आरती
लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार ः राजू शेट्टी

मुंबई : सशस्त्र पोलीस शिपाई भरती -2021 शारीरिक चाचणी मधील 2 हजार 562 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार 23 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक 452 असून स्टॉपचे नाव मयूर नगर बस स्टॉप आहे. या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी  23 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत या परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी 11 वाजता सुरू होईल. उशिरा येणार्‍या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटीने ई-मेलद्वारे पुरविलेले शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची कलर प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन कलर पासपोर्ट साईज छायाचित्र, तसेच या कार्यालयाकडून मैदानी चाचणी करीता पुरविण्यात आलेले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

COMMENTS