Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Mumbai Avighna Fire : आगीपासून वाचण्यासाठी लोकांनी मारल्या इमारतीवरून उड्या (Video)

मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठ मजली इमारतीमध्य

राज्यस्तरीय आमदार चषक 2023 कबड्डी स्पर्धेचे आयोजन  संपन्न
दुर्देवी ! लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात .
ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठ मजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. या आगीपासून वाचण्यासाठी दोन व्यक्तींनी इमारतीवरून उडी मारल्याचा प्रकार घडला आहे . अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सुदैवाने कुठल्याही जीवितहानीचं अद्याप वृत्त नाही.


करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही.

COMMENTS