नवी दिल्ली : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला कडक सुरक्षेत अखेर भारतात आणण्यात आले आहे. त्या

नवी दिल्ली : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला कडक सुरक्षेत अखेर भारतात आणण्यात आले आहे. त्याच्यासोबत एनआयए आणि गुप्तचर संस्था रॉ यांचे संयुक्त पथक एका खास विमानाने गुरुवारी दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. या नंतर त्याला विमानतळावरुन थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेले जात आहे. तहव्वुर राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. लष्कर-ए-तैयबा आणि डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. आता अखेर या प्रयत्नांना यश आले अन् राणा भारतात दाखल झाला.
अमेरिकेतून आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच राणाला एनआयएने अटक केली. यानंतर त्याला एनआयए मुख्यालयात नेण्यात आले तिथे त्याची चौकशी करण्यात आली. एनआयए मुख्यालयात त्याच्या चौकशीसाठी चौकशी कक्ष तयार करण्यात आला आहे. एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयजी आशिष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांच्यासह फक्त 12 सदस्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यानंतर तहव्वुर राणाला तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. तहव्वूर राणा हा पाकिस्तानी लष्कर-आयएसआयचा सदस्य आहे. तो 26/11 हल्ल्याच्या कटात सामील होता.
COMMENTS