Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वांगदरी येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ची अंमलबजावणी

 श्रीगोंदा : वांगदरी गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विविध विकास उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहेत. मुख्य कार्यकारी अधिका

कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख
श्रीगोंद्यातील क्रीडा संकुल महत्वपूर्ण ठरेल : पालकमंत्री विखे 
रामदास शिंगाडे यांचा रयत सेवक समितीकडून सन्मान

 श्रीगोंदा : वांगदरी गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विविध विकास उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर भंडारी यांनी अभियानांतर्गत कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

 गावातील विकासकामांमध्ये विठ्ठलराव नागवडे, राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुजाता नागवडे, उपसरपंच सारिका चोरमले व ग्रामपंचायत सदस्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे मीयावाकी (घनवन) फळबाग लागवड, जंगली वृक्ष व बांबू लागवड, बालविवाह मुक्त अभियान, आरोग्य तपासणी कॅम्प, कुपोषण मुक्त अभियान, वनराई बंधारे व नारी सन्मान मेळाव्यांत ॲनिमिया तपासणीसह दिव्यांग महिलांना व्हीलचेअर व शिलाई मशीन वितरण यांसारखी कामे यशस्वीरीत्या राबविली गेली आहेत.

 ग्रामस्तरीय वाद गावातच मिटविणे, श्रमदान व स्वच्छता अभियान, प्लास्टिक कचरा प्रकल्प आणि जलतारा प्रकल्प या उपक्रमात विस्ताराधिकारी सारिका हराळ, कृषी विस्तार अधिकारी काकासाहेब खोसे आणि ग्रामपंचायत अधिकारी एल. व्ही. मुरकुटे यांचे सहकार्य लाभले आहे.

 अभियानामध्ये माजी सरपंच आदेश नागवडे, संजय नागवडे, महेश नागवडे, माजी उपसरपंच शिवाजी चोरमले तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा सहभाग उत्कृष्ट ठरला आहे. विद्यमान सरपंच सुजाता नागवडे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.

COMMENTS