Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराई बाजार समितीच्या सभापती पदी मुजीब पठाण तर उपसभापती पदी विकास सानप यांची निवड

गेवराई प्रतिनिधी - मराठवाड्यातील अग्रगण्य बाजार समिती म्हणुन ओळख असलेल्या गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार अमरसिंह पंडित

कोरोनासह स्वाईन फ्लूचीही होणार तपासणी
कृषी विभाग चा दिंद्रुड येथे महिला किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न
राज्यात अवकाळीने 87 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

गेवराई प्रतिनिधी – मराठवाड्यातील अग्रगण्य बाजार समिती म्हणुन ओळख असलेल्या गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. बाजार समितीच्या सभापती पदी मुजीब पठाण तर उपसभापती पदी विकास सानप यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजाचा व्यक्ती सभापती पदी विराजमान झाला आहे. अमरसिंह पंडित यांनी मुजीब पठाण यांच्या माध्यमातुन मुस्लिम समाजाला संधी दिल्याबद्दल समाज बांधवांकडुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचे अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित व इतर मान्यवरांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. गुलालाची उधळन करुन कार्यकर्त्यांनी जल्लोषात या निवडीचे स्वागत केले.    
गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार अमरसिंह पंडित यांना भाजपा आमदार लक्ष्मण पवार आणि माजी आमदार बदामराव पंडित यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली 18 पैकी 18 संचालक 90 टक्याहुन अधिकची मते घेवुन विजय झाले. या निवडणुकती आजी-माजी आमदारांच्या पॅनलचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडुन धुव्वा उडाला. सोमवार दि. 15 मे रोजी निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत मुजीब पठाण यांचा सभापती पदासाठी तर विकास सानप यांचा उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज  दाखल झाल्यामुळे दोहोंची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी निवडणुक प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी सभापती आणि उपसभापती पदाच्या उमेदवारांची घोषणा केली. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत दोहोंनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळन करुन जल्लोषात या निवडीचे स्वागत केले.
गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजाचा व्यक्ती सभापती पदाच्या खुर्चीवर विराजमान झाला आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी मुजीब पठाण यांच्या माध्यमातुन मुस्लिम समाजाला तर विकास सानप यांच्या माध्यमातुन ओबीसी समाजाला संधी दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील अग्रगण्य बाजार समिती म्हणुन गेवराई बाजार समितीची ओळख असुन आजवर स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे विरोधकांना सुद्धा बाजार समितीवर आरोप करता आले नाहीत, सर्वांनी मिळुन एकत्रित कारभार करुन बाजार समितीच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकर्यांची सेवा करावयाची असल्याचे प्रतिपादन यावेळी अमरसिंह पंडित यांनी केले. त्यांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. विजयसिंह पंडित यांनी सभापती मुजीब पठाण आणि उपसभापती विकास सानप यांना त्यांच्या नियोजित आसणावर विराजमान केले. नवनिर्वाचित संचालक अशोक नाईकवाडे, रामलाल धस, महारुद्र चाळक, हनुमान कोकणे, पांडुरंग मुळे, बाबासाहेब जाधव, सौ. वैशाली बाबु जाधव, श्रीमती लक्ष्मीबाई नारायण पवार, रमेश साखरे, अशोक खरात, रमेश खोपडे, मंगेश कांबळे, जगन्नाथ काळे, रामभाऊ चाळक, दिलीपकुमार गंगवाल आणि कृष्णा राऊत यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जगन्नाथ शिंदे, जगन पाटील काळे, कुमाराव ढाकणे, सुभाषराव मस्के, बबनराव मुळे, आप्पासाहेब गव्हाण, बाबुराव काकडे, शेख खाजाभाई, सय्यद नजीब, सरवर पठाण, इमू पटेल, सोमेश्वर गचांडे,   संतोष लाखे, शांतीलाल पिसाळ, बाबुराव राऊत, अनिरुद्र तौर, सऊद पठाण, भागवत काकडे, भागवत चौधरी, राम यादव, लक्ष्मण देवकर, अ‍ॅड. स्वप्निल येवले, शाम पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS