बीड : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेकनूर येथे मोदी हटाव, देश बचाव या घोषवाक्याखाली भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणांव

बीड : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेकनूर येथे मोदी हटाव, देश बचाव या घोषवाक्याखाली भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तसेच विविध राष्ट्रीय व सामाजिक प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले.
आंदोलनाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुद्रा मोदी से मुजरा, मोदी हटाव, देश बचाव, बेटी बचाव अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी आंदोलकांनी देशात धार्मिक ध्रुवीकरण वाढत असल्याचा आरोप करत भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली. तसेच निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदानाची व्यवस्था लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्याची भावना व्यक्त करत नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. याचबरोबर महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याबाबत निर्णय घ्यावा, शेतकर्यांच्या हिताला बाधा आणणार्या परदेशी व्यापार करारांचा पुनर्विचार करावा तसेच विविध संशयास्पद प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करावी, अशा मागण्या देखील करण्यात आल्या. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, बालाघाटावरील नेते सतीश पायाळ, अर्जुन जावंजाळ , राजेशकुमार जोगदंड, बाळासाहेब मोरे, गोरक्षनाथ कदम, रायचंद कापसे, रोशन धिवार, मयुर निर्मळ, दिनेश अविळे, रवि गायकवाड, बबलू गायकवाड, ओम करे, अशोक करडे, संजय ढोकने, दिपक भालेराव, विशाल इंगोले, नितीन पायाळ, मुना दुनघव, फुलचंद वारभवन, अर्जुन धनवे, लखन जोगदंड, मिलिंद सरपते आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आंदोलन शांततेत पार पडले असून आंदोलकांच्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

COMMENTS