Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणेकरांना आता गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा

महानगरपालिकेडून पाणी उकळून पिण्याचे आवाहन

पुणे : पुणेकरांमागच्या व्यथा अजूनही काही संपण्याची चिन्हे नाहीत. कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पुणेकरांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल

मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी… ‘या’ पक्षात केला प्रवेश
शिवांकुर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात
शाहरूख खानचा अमेरिकेत अपघात

पुणे : पुणेकरांमागच्या व्यथा अजूनही काही संपण्याची चिन्हे नाहीत. कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पुणेकरांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. तब्बल 32 वर्षानंतर पुणेकरांनी अतिवृष्टी अनुभवली. या पावसामुळे शहरातील काही भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, या पुराचे पाणी ओसारल्यानंतर आता पुणेकरांपुढे नवे संकट उद्भवले आहे. पुणे पालिकेतर्फे नळाद्वारे पुरवण्यात येणारे पाणी हे दूषित, गढूळ आणि गाळयुक्त येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पुण्यात झालेल्या शहरात मुसळधार पावसामुळे नळाला दूषित आणि गढूळ पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. एकीकडे पुण्यात साथ रोगांनी थैमान घातले असतांना नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याने आणखी रोगराई वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकारांवर मनपा पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता नंदकिशोर जटप यांनी नागरिकांना दूषित पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला आहे. जटप म्हणाले, नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जात असला तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, आरोग्याचा अतिरिक्त उपाय म्हणून घरगुती वापरासाठी पिण्याचे पाणी उकळून गाळून प्यावे. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दूषित पाणी प्यायल्याने पसरणार्‍या जलजन्य आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महानगर पालिकेने केले आहे. दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे अतिसार, जुलाब, कॉलरा, टायफॉईड ताप, हिपॅटायटीस यांसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी किंवा मनपा आरोग्य केंद्रांना सतर्क करा, असे आवाहन मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी केले आहे. अतिसार, जुलाब, सर्दी किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या उपआरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळवंत यांनी केले आहे. नागरिकांनी आपल्या इमारतींमधील भूमिगत आणि ओव्हरहेड अशा दोन्ही प्रकारच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या कराव्या तसेच नळ किंवा व्हॉल्व्हमधील गळती दुरुस्त करून टाक्यांभोवती स्वच्छता ठेवावी, असे आवाहन देखील पालिकेच्या आरोग्य अधिकारी कल्पना बळीवंत यांनी केले आहे. पळर पुण्यात झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रविवारी आणखी 9 जणांना झिकाची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे आता बाधित रुग्णांची संख्या ही 48 झाली आहे. रविवारी आढळलेल्या 9 रुग्णांपैकी 7 रुग्ण पुणे महापालिका हद्दीत वाघोली, पुणे ग्रामीण आणि पुणे कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

COMMENTS