Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अबॅकस स्पर्धेत कु. ज्ञानेश्‍वरी चन्ने जिल्ह्यात चॅम्पियन

Oplus_0 पाथर्डी : नुकत्याच नगर येथे पार पडलेल्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत येथील श्री यशवंत पब्लीक स्कूलची विद्यार्थि

दैनिक लोकमंथन l बोठेशी संबंधित ‘त्या’ फोनचे फॉरेन्सिक अहवाल प्रतीक्षेत
व्यक्ती मरते पण विचार कायम जिवंत असतात ः प्रा. किसन चव्हाण
कर्जतच्या सदगुरु कन्या विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार
Oplus_0

पाथर्डी : नुकत्याच नगर येथे पार पडलेल्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत येथील श्री यशवंत पब्लीक स्कूलची विद्यार्थिनी कु.ज्ञानेश्‍वरी योगेश चन्ने ही जिल्हात चॅम्पियन ठरली आहे. नुकत्याच नगर येथे एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धा नगर येथे पार पडल्या. या स्पर्धेत जवळपास नऊ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शहरातील श्री यशवंत पब्लिक स्कूलची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु. ज्ञानेश्‍वरी योगेश चन्ने हिने अवघ्या पाच मिनिटांत 150 प्रश्‍नांची बेरीज वजाबाकी करून जिल्ह्यात चॅम्पियन ठरली.तर जुई नितीन हजारे या विद्यार्थिनीने 140 प्रश्‍नांची बेरीज वजाबाकी करत प्रथम क्रमांक पटकावला. तर सम्राट अभिजित मेहेत्रे याने 90 पेक्षा जास्त प्रश्‍नांची बेरीज वजाबाकी करून उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉपी देऊन सन्मानित करण्यात आले. वरील सर्व विद्यार्थ्यांना शौर्य अबॅकस अकॅडमीच्या प्रियंका पालवे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS