Homeताज्या बातम्यामनोरंजन

श्री. राजाभाऊ घुले यांचा बिगबजेट “अंकुश” चित्रपट ६ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात

पुरेपूर मनोरंजनाची मेजवानी ठरणारा "अंकुश" चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

बीडचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते श्री. राजाभाऊ घुले यांचा  बिगबजेट, अॅक्शनचा दमदार तडका असलेला "अंकुश" हा चित

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
महागाईसह इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह बैलगाडी चालवून निषेध
देवळा ग्रामपंचायत उपसरपंचपदी दत्ता साळुंके

बीडचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते श्री. राजाभाऊ घुले यांचा  बिगबजेट, अॅक्शनचा दमदार तडका असलेला “अंकुश” हा चित्रपट ६ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कथानकाला प्रेमकथेची जोड  असलेल्या “अंकुश” या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच हिट ठरत आहे. 

ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले ‘अंकुश’ या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांचे आहे .  मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार- महेश या सिनेमाचे संगीतकार आहेत, हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत केले आहे. मंगेश कांगणे,क्षितिज पटवर्धन, समृद्धि पांडे  आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, अमितराज , हर्षवर्धन वावरे, राहुल सक्सेना, नकाश अजीज आणि केतकी माटेगांवकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.  नागराज दिवाकर यांनी छायांकन, तसेच अनेक पुरस्कार प्राप्त संकलक नीलेश गावंड यांनी या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि केजीएफसारख्या चित्रपटांचे अॅक्शन दिग्दर्शक विक्रम मोर, विख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी नृत्य दिग्दर्शन, कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर यांनी केलं असून  विशाल चव्हाण कार्यकारी निर्माता आहेत. चित्रपटात केतकी माटेगावकर, दीपराज घुले. सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, मंगेश देसाई, ऋतुजा बागवे,शशांक शेंडे,गौरव मोरे, नागेश भोसले ,पूजा नायक अशी दमदार स्टारकास्ट आहे. 

सामान्य कुटुंबातला तरुण, त्याच्या आयुष्यात आलेली तरुणी, कॉलेज जीवनात उमलणारं प्रेम, काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाला समोर आलेला राजकारणाचा डाव असा थरार अंकुश या चित्रपटात आहे. म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतला दमदार अॅक्शनपट म्हणून अंकुश या चित्रपटाकडे पाहिलं जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच धडाकेबाज अॅक्शनचं दर्शन घडत आहे. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. गायिका अभिनेत्री केतकी माटेगावकरचं लोभस दिसणंही चित्रपटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुरेपूर मनोरंजनाचा आनंद देणारा “अंकुश” हा चित्रपट नक्कीच पहा.

COMMENTS