Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यभर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

नवा परीक्षा पॅटर्न लगेच लागू करण्यास केला विरोध

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा पॅटर्नमध्ये आयोगाने बदल करत, राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही

लॉकडाऊनमुळे संगमनेरची बाजारपेठ ठप्प !!
दूध, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक चिंतेत
पाथर्डी तालुक्यातील करडवाडी गावात दारूबंदी करावी

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा पॅटर्नमध्ये आयोगाने बदल करत, राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपाची होणार आहे. हा बदल येत्या 2023 या वर्षापासून राबविण्यात येेणार आहे. याला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी विरोधक करत, शुक्रवारी राज्यभर आंदोलने केले.
पुण्यासह राज्यभरात हजारो विद्यार्थी शुक्रवारी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीची रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यापुढच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. ही नवी परीक्षा पद्धती 2023 पासून म्हणजे याच वर्षीपासून लागू करण्यात येणार आहे. असे करण्यास विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे. राज्य लोकसेवा आयोगाने नवी परीक्षा पद्धत लागू करण्याची घाई करू नये. विद्यार्थ्यांना वेळ द्यावा. 2025 पासून ही परीक्षा पद्धती लागू करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. युवक काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केले. नागपूर, कोल्हापूर व औरंगाबादमध्येही आंदोलन करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून आम्ही परीक्षेची तयारी करत आहोत. आता नव्या पद्धतीने परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी पुन्हा दोन वर्षे तयारी करावी लागेल. हा आमच्यावर अन्याय आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दोन वर्षे दिल्यास नव्या पद्धतीने अभ्यास करणार्‍यांनी पुरेसा वेळ मिळेल, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नव्या अभ्यासक्रमाला किंवा परीक्षा पद्धतीला आमचा अजिबात विरोध नाही. फक्त विद्यार्थ्यांना त्यासाठी वेळ देण्यात यावा. राज्य सरकार यासाठी इतकी घाई का करत आहे, असा सवाल युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

COMMENTS