Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार उदयनराजे भोसले आज रायगडावर मोठा निर्णय घेणार असल्याचा इशारा

सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांचा अवमान करणार्‍या प्रवृत्ती विरोधात सत्ताधारी सरकारने कोणतीही कारवाई न केल्याने संतापलेले खा. श्री. छ. उद

मोदी सरकारकडून जनतेची पिळवणूक : आ. पृथ्वीराज चव्हाण
शेतकर्‍यांनो राज्य नको राज्यकर्ते बदला : रघुनाथदादा पाटील याचे आवाहन
सातार्‍यातील जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी

सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांचा अवमान करणार्‍या प्रवृत्ती विरोधात सत्ताधारी सरकारने कोणतीही कारवाई न केल्याने संतापलेले खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगून सत्ताधार्‍यांना इशारा दिला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या अन्य नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावर सर्वच पक्षातील राजकीय नेते एकमेकांविरुध्द आरोप करत आहेत.
या एकूणच घटना प्रसंगांवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आपण व्यथित आहोत. त्यामुळेच आपण उद्या रायगडावर जात आहोत. रायगडावर आपल्याला शिवप्रेमी मिळतील. तेथे आयोजिक केेल्याल्या मेळाव्यात आपण आपली भूमिका स्पष्ट करणार आहोत, असे सांगून अप्रत्यक्षपणे सत्ताधार्‍यांना इशारा दिला आहे.
त्यामुळे आता रायगडावर खा. उदयनराजे नेमके काय बोलणार? ते या प्रकरणावर काय भूमिका मांडणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या दरम्यान या प्रकरणावर आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे, असा विचारले असता त्यांनी त्यास नकार दिला. तसेच आपल्याला कोणीही फोन केला नाही आणि आपले कोणाशीही बोलणे झाले नसल्याचे सांगितले.

COMMENTS