अहिल्यानगर प्रतिनिधीहिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक मोहरम निमित्त खासदार निलेश लंके यांनी कोठला येथे हजरत इमाम हुसेन यांच्या सवारीचे द
अहिल्यानगर प्रतिनिधी
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक मोहरम निमित्त खासदार निलेश लंके यांनी कोठला येथे हजरत इमाम हुसेन यांच्या सवारीचे दर्शन घेतले. यावेळी अनेक हिंदू – मुस्लिम भक्त उपस्थित होते. मोहरम निमित्त शहरात विविध ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. माजी महापौर अभिषेक कळमकर, उद्योजक अल्ताफ शेख, माजी नगरसेवक मुदस्सर शेख, माजी नगरसेवक योगीराज गाडे, मावळा संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर निमसे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


COMMENTS