डॉ. अशोक सोनवणेअहमदनगर ः शिर्डीचे खासदार म्हणून खासदार सदाशिव लोखंडे यांची ओळख असली तरी, गेल्या पाच वर्षांत त्यांनी केवळ भ्रष्टाचारात अव्वल क्रमा
डॉ. अशोक सोनवणे
अहमदनगर ः शिर्डीचे खासदार म्हणून खासदार सदाशिव लोखंडे यांची ओळख असली तरी, गेल्या पाच वर्षांत त्यांनी केवळ भ्रष्टाचारात अव्वल क्रमांक पटकावला असून, त्यांनी नाबार्डचे सरकारी अनुदान लाटण्यात देखील आपण पटाईत असल्याचे सिद्ध केले आहे. खरंतर खासदार म्हटला की, जनतेच्या अडी-अडचणींना धावून जाणारा. मात्र खासदार लोखंडे याला अपवाद असून, त्यांनी आपण केवळ भ्रष्टाचारात आणि सरकारी अनुदान लाटण्यात अव्वल असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांनी केवळ आपलेच खिसे कसे भरता येईल, यासाठी सर्व शक्यतांचा वापर करून त्यांनी हात-साफ करून घेतले. त्यांनी यासाठी खासदार लोखंडे यांनी स्वतंःच्या कुटुंबासाठी कोट्यावधींचे अनुदान लाटले आहे. लोखंडे यांनी खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनीच्या नावे हे अनुदान लाटले आहे. विशेष म्हणजे चन्नूर येथे नोंदणीकृत असलेल्या संस्थेच्या संचालकपदी लोखंडे यांच्या कुटुंबातील पाचजण आहेत. त्यामध्ये त्यांची पत्तनी नंदा, मुले प्रशांत व राज आणि सुना प्रियांका आणि आश्विनी यांचा समावेश असून अन्य कुटुंबांतील 10 जण सदस्यपदावर आहे. विशेष म्हणजे येथे देखील सरकारी नियमांना बगल दिल्याचे दिसून येत आहे. एकाच कुटुंबांतील दोन व्यक्ती संचालकपदावर असू नयेत असा नियम असतांना खासदार लोखंडे यांनी शासकीय नियमांना पायदळी तुडवले. शिवाय या कंपनीला केंद्र सरकारने 32 कोटी रूपयांपेक्षा अधिक अनुदान मंजूर केले आहे. त्यापैकी 16 कोटी अनुदान मिळाले आहे. त्यामुळे आपण सरकारी अनुदान लाटण्यात देखील पटाईत असल्याचे लोखंडे यांनी दाखवून दिले आहे.
बरं खासदार लोखंडे सरकारी योजनांवर मोठ्या प्रमाणावर डल्ला मारतांना दिसून येत आहे. श्रीरामपूरच्या म्हाडामध्ये अतिक्रमण करून आपण आपल्याच सरकारच्या ना खाऊँगा ना खाणे दूँगा च्या तत्वाला तिलांजली देतांना खासदार लोखंडे दिसून येत आहे. रहिवासी म्हाडा क्षेत्रात लोखंडे यांनी श्रीरामपूरमध्ये 40 बाय 40 आकाराचे भव्य शेड खुद्द त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने व निवडणुकीसाठी बांधलेले आहे. त्यामुळे खासदार भ्रष्टाचार, अनुदान लाटण्यासोबतच अतिक्रमण करण्यात आपण अव्वल असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेकडे मतदान मागण्यांसाठी जात असतांना खासदार लोखंडे यांना जनतेने सवाल विचारण्याची खरी गरज आहे.
रस्ते, दूध, कांदा प्रश्नांवर चुप्पी ! – आपलेच खिसे भरण्यात व्यस्त असणारे खासदार लोखंडे साहेब जनतेच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार आहात. आपण आपल्या कार्यकाळात कधी रस्त्याचा, दूधाचा, कांद्याचा प्रश्न मांडल्याचे दिसून येत नाही. मात्र आपलीच तिजोरी भरण्यात आपण व्यस्त असल्याचे दिसून येत आहात. त्यामुळे आता कोणत्या तोंडाने तुम्ही जनतेच्या दारात जात आहात, असा सवाल जनतेने खासदार महोदयांना विचारण्याची खरी गरज आहे.
9822254475 वर संपर्क साधा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाची खासदारकी दोनदा मिळूनही खासदार सदाशिव लोखंडे यांना लोकाभिमुख कारभार करता आला नाही. केवळ भ्रष्टाचाराच्या कुरणात आपले हात कसे ओले होईल याची दक्षता त्यांनी नेहमीच घेतली. त्यामुळे त्यांच्यावर लोकांची प्रचंड नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील वाचकांनी आपले मते, तक्रारी, तसेच भ्रष्टाचारासंदर्भात असलेल्या तक्रारीची पोलखोल करण्यासाठी 9822254475 या क्रमाकांवर संपर्क साधावा. आपली ओळख गुप्त ठेवण्यात येईल.
COMMENTS