संगमनेर ः दूध उत्पादक शेतकर्यांबद्दल एवढाच कळवळा असेल तर, खासदार निलेश लंके यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ
संगमनेर ः दूध उत्पादक शेतकर्यांबद्दल एवढाच कळवळा असेल तर, खासदार निलेश लंके यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघापासून करावी, असे थेट आव्हान भाजपा विधानसभा प्रमुख अमोल खताळ पाटील यांच्यासह दूध उत्पादक शेतकर्यांनी केले आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हणले आहे की, राज्यात महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकर्यांना पाच रुपयाचे अनुदान देण्याची योजना सुरू करून त्याची अंमलबजावणी केली. एकीकडे दूधाला भाव नाही म्हणून सरकारच्या विरोधात ओरडणारे खा.निलेश लंके मात्र दूध उत्पादक शेतक-यांना मदत करण्याचे आव्हान दुध संघ चालविणार्या माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांना सांगूही शकले नाहीत हे दुर्दैव आहे. सरकार कडून अपेक्षा व्यक्त करताना दूध संघांनीही शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहण्याची मागणी खरे तर खा.लंके यांनीकरायला हवी होती. परंतू दूध उत्पादक शेतक-यांवरचे बेगडी प्रेमच त्याचे आता स्पष्ट होत आहे. वास्तविक सरकारने पाच रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय करताना दूध संघानी सुध्दा एक पाऊल पुढे टाकून मदत करणे गरजेचे होते. कारण एकीकडे दूध उत्पादक शेतकर्यांना भाव नाही आशी ओरड करणारेच दूध संघाचे चालक ग्राहकांना चढ्या भावाने दूधाची विक्री करतात. महाविकास आघाडीची आशी दुहेरी भूमिका कशी? असा सवाल अमोल खताळ पाटील यांनी व्यक्त केला. केवळ व्यक्ति द्वेषापोटी दूध अनुदानाचे राजकारण करण्यापेक्षा दूध उत्पादक शेतकर्यांच्या बद्दल खरीच आत्मियता असेल तर खा.लंके यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघापासून करावी असे आव्हान या पत्रकातून केले आहे.
COMMENTS