Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन

पुणे : लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट यांचे वयाच्या ७४ व्या  वर्षी दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दीर्घ आजाराने

भारताच्या दुसर्‍या विजयाने पाकिस्तानचे धाबे दणाणले
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी
एकरी 100 टन ऊसाचे उत्पादन घेणार्‍या महिला शेतकर्‍यांचा सन्मान होणार : संगीता साळुंखे

पुणे : लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट यांचे वयाच्या ७४ व्या  वर्षी दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी असेल. सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  खासदार गिरीश बापट यांची प्रकृती आज सकाळी खालावली होती.  त्यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना सुरवातीला लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.  बापटांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला होता. त्यांच्या निधनाने राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला.

COMMENTS