Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार भगरे यांची अ‍ॅड. संदीप वर्पे यांच्या निवासस्थानी भेट

Oplus_131072 कोपरगाव शहर ः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. संदीप वर्पे यांच्या कोपरगाव येथ

नगर मनपाचे नगरसेवक फक्त सांगकामे झालेत…भाजप नगरसेवक कोतकरांचा उद्विग्न दावा
नाटेगावातील शेतकर्‍यांचे उपोषण मागे
भंडारदर्‍याच्या काजवा महोत्सवाची जय्यत तयारी
Oplus_131072

कोपरगाव शहर ः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. संदीप वर्पे यांच्या कोपरगाव येथील ’पसायदान’ या निवासस्थानी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्करराव भगरे यांनी नुकतीच सदिच्छा भेट देत वर्पे यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पुरुषोत्तम पडियार, रंजन जाधव, संतोष वढणे, समीर वर्पे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे कोपरगाव शहर अध्यक्ष स्वप्निल पवार, सोशल मीडिया प्रमुख ऋतुराज काळे आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 याप्रसंगी अ‍ॅड. संदीप वर्पे यांनी बोलताना सांगितले की, मी खासदार भगरे यांना  येवला नाका येथे घ्यायला गेलो असता त्यांनी स्वतः गाडी चालवत मला शेजारी बसून मलाच माझ्या घरी घेऊन आले असे कुठलाही बडेजाव नसलेले सामान्य व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असलेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या पारखी नजरेने व परिस स्पर्शाने निवडलेल्या नवरत्नांपैकी एक हिरा म्हणून खासदार भास्करराव भगरे असल्याचे मत अ‍ॅड. संदीप वर्पे यांनी व्यक्त करत खासदार भगरे यांचा येथीचीत सन्मान करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अ‍ॅड. संदीप वर्पे हे उगवते, युवा, अभ्यासू, विचारवंत व खासदार शरदचंद्र पवार यांचे विश्‍वासू खंदे समर्थक म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असून भविष्यात त्यांना नक्कीच राज्याच्या राजकारणात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळेल.
खासदार भास्करराव भगरे

COMMENTS