Homeताज्या बातम्यादेश

एससी-एसटी आरक्षणातील क्रीमिलेयर विरोधात देशभर भारत बंदची हाक देत विविध संघटनांचे आंदोलन

नवी दिल्ली ः सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अर्थात एससी आणि अनुसूचित जमाती अर्थात एसटी आरक्षणात क्रीमिलेयर लागू करण्याच्या विरोधात बुधवारी वि

“तुझं मुळ विसरू नकोस”, झोमॅटोच्या जाहिरातीवरून अल्लू अर्जुन झाला ट्रोल |
कोरोनाचे सव्वा दोन लाख डोस शिल्लक I LOKNews24
आधीच क्रिमी लेयरचे ग्रहण, त्यात भंपक डॉक्टरचा स्टंट !

नवी दिल्ली ः सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अर्थात एससी आणि अनुसूचित जमाती अर्थात एसटी आरक्षणात क्रीमिलेयर लागू करण्याच्या विरोधात बुधवारी विविध दलित-आदिवासी संघटनांनी भारत बंदची हाक देत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड ट्रायबल ऑर्गनायझेशनने याला दलित आणि आदिवासींच्या घटनात्मक अधिकारांच्या विरोधात म्हटले आहे. भारत बंदचा सर्वाधिक परिणाम बिहारमध्ये दिसून येत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. काँग्रेस, टीएमसी, सपा, बसपा, आरजेडी, जेएमएमसह अनेक पक्षांनी बंदला पाठिंबा दिला आहे. अनुसूचित जाती आरक्षणात क्रिमी लेयर लागू होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद0 मोदी यांनी 9 ऑगस्ट रोजी सांगितले होते. 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई यांनी टिप्पणी केली होती की, एससी-एसटीमध्ये क्रीमिलेयर लागू करण्याचाही विचार केला पाहिजे. दलित खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली होती.

रांचीमध्ये जाळपोळ – सर्वोच्च न्यायालयाच्या एससी आरक्षणात क्रिमी लेयर लागू करण्याच्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी बुधवारी  भारत बंदची हाक दिली आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये भारत बंदचा परिणाम दिसू लागला आहे. बंद समर्थकांनी सकाळी 9 वाजल्यापासून रांची शहरी भाग तसेच रिंगरोड परिसरात उतरून रस्ते अडवले. तर याठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली आहे.

COMMENTS