Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी आगारप्रमुखांच्या दालनात सर्वपक्षीय नेत्यांचे आंदोलन

पाथर्डी ः पाथर्डी आगारात काम करणार्‍या दोन हेड मॅकेनिक चे निलंबन मागे घ्यावे,नवीन एस टी बस तातडीने पुरवाव्यात,आगारात सर्व स्पेअरपार्ट तातडीने उपल

ग्रामपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस जोमाने लढविणार ः नागरे
मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांचा विखेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार
वंचितच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देणार ः निलेश गायकवाड                                    

पाथर्डी ः पाथर्डी आगारात काम करणार्‍या दोन हेड मॅकेनिक चे निलंबन मागे घ्यावे,नवीन एस टी बस तातडीने पुरवाव्यात,आगारात सर्व स्पेअरपार्ट तातडीने उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी आज सर्वपक्षीय नेत्यांनी आगार प्रमुखांच्या दालनात धरणे आंदोलन केले. वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करत यावर सोमवारी निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले.
पाथर्डी आगारात काम करणारे बाळासाहेब सोनटक्के व जाधव यांना कर्तव्यात कसूर केल्याचे कारण दाखवत निलंबित करण्यात आल्याने त्याचे पडसाद इतर कर्मचार्‍यांमध्ये उमटून आगारात काम करत असलेल्या 16 कर्मचार्‍यांनी सामूहिक रजेचा अर्ज आगार प्रमुख अरिफ पटेल यांना देत काम बंद आंदोलन सुरु केले.या आंदोलनाची माहिती समजताच माजी नगरसेवक बंडुपाटील बोरुडे, चांद मणियार, अविनाश पालवे,नासिर शेख,संतोष जिरेसाळ,प्रशांत शेळके हे आगारात दाखल झाले व त्यांनी पटेल यांच्या दालनात धरणे आंदोलन सुरु केले. यावेळी आंदोलकांनी आगारात असलेल्या बस गाड्यांची संख्या किती व त्या आतापर्यंत किती किलोमीटर चालवल्या याची माहिती पटेल यांना विचारली असता पटेल यांनी आगारात 58 बसेस असून त्यातील फक्त पाच बस पाच लाख पेक्षा कमी किलोमीटर धावल्या असून इतर गाड्या मात्र त्या पेक्षा अधिक धावल्या असून एक बस ने आजपर्यंत 16 लाख कि. मी. प्रवास केल्याचे सांगितले. या वर आंदोलकांनी ज्या गाड्यांचे आयुष्य संपले आहे त्या तुम्ही कशा वापरता.जिह्यातील इतर आगारात नवीन बसेस दिल्या जातात मात्र गेल्या आठ वर्षात एकही नवीन बस का आली नाही.ज्या कर्मचार्‍यांना तुम्ही निलंबित केले आहे त्या कर्मचार्‍यांचा चुकीचा अहवाल उपयंत्र अभियंता यांनी दिला असल्याचा आरोप आंदोलकांनी व कर्मचार्‍यांनी या वेळी करत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या चुकीचे खापर कर्मचार्‍यांवर फोडण्याचे काम का करता अशी टीका करत सध्या लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे असताना सुद्धा नवीन बसेस आगारात का दाखल होत नाही असा प्रश्‍न उपस्थित केला.कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घ्यावे,स्पेअरपार्ट लगेच मागवावेत व नवीन बस या आगारात नेमक्या कधी दाखल होणार याची माहिती दिल्या शिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आम्ही आगाराचे गेटबंद करू असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्या नंतर पटेल यांनी पोलीस बंदोबस्त मागवत वरिष्ठ अधिकार्‍यांशी फोनवरून चर्चा केल्या नंतर येत्या सोमवार पर्यंत या विषयवार निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले.  

COMMENTS