Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवघ्या दहा तासात मोटरसायकल चोरास अटक

शिराळा / प्रतिनिधी : मोटारसायकल चोरी प्रकरणी विक्रम चंद्रकांत पाटील (वय 28, रा. कोतोली, ता. शाहूवाडी) यास अवघ्या 10 तासात अटक करण्यात आली असून या

12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे; तुमचे आजचे राशीचक्र गुरुवार, २६ ऑगस्ट २०२१ l पहा LokNews24
भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात 22 शेळ्यासह एक व्यक्ती जखमी

शिराळा / प्रतिनिधी : मोटारसायकल चोरी प्रकरणी विक्रम चंद्रकांत पाटील (वय 28, रा. कोतोली, ता. शाहूवाडी) यास अवघ्या 10 तासात अटक करण्यात आली असून याबाबतचा गुन्हा कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
कोकरुड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार, दि. 29 रोजी बँक ऑफ इंडियाच्या कोकरुड, ता. शिराळा या शाखेच्या इमारतीसमोर लावलेली बँकेच्या मालकीची काळ्या रंगाची बजाज बॉक्सर मोटारसायकल दुपारी एकच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली असल्याची फिर्याद गुंजन गोयल यांनी कोकरुड पोलिसात दिली होती. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेत संशयित आरोपी विक्रम पाटील यास त्याच्या मोबाईल लोकेशनवरुन रात्री दहाच्या सुमारास फुफेरे फाटा येथे अटक केली. तसेच 50 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त केली. सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस नाईक शिवाजी जाधव, पोलीस नाईक अभिजित कारंजकर, पोलीस कॉन्स्टेबल सुहास डाकवे, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रोडे, सतीश पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडेवाड यांनी ही कारवाई केली.

COMMENTS