Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परशुराम जयंती निमित्ताने मोटार सायकल रॅली

लातूर प्रतिनिधी- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूर शहरातून परशुराम जयंती उत्सव 2023 उत्सव समितीच्या वतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅली

राहाता शहरात गुढीपाडव्यानिमित्त मोटारसायकची रॅलीचे आयोजन
मतदान जागृतीसाठी श्रीरामपुरात मोटारसायकल रॅली
मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मोटर सायकल रॅलीचे आयोजन

लातूर प्रतिनिधी- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूर शहरातून परशुराम जयंती उत्सव 2023 उत्सव समितीच्या वतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये युवकासह महीला भगिनीचा जेष्ठ नागरिक यांचा मोठा सहभाग दिसत होता. रॅली मध्ये ब्राम्हण बांधवांनी जय परशुराम अशा घोषणा देत शहरातील प्रमुख रस्त्यावरून निघालेली रॅली परशुराम पार्क येथे विसर्जित करण्यात आली.
तत्पूर्वी रैलीचा शुभारंभ केशवराज मंदिर येथे करत ही रॅली राम गल्ली, दयाराम रोड, सुभाष चौक, गंज गोलाई, महात्मा गांधी चौक, लोकमान्य टिळक चौक, छत्रपती शिवाजी चौक, बार्शी रोड पि. व्ही. आर चौक, परशुराम पार्क या ठिकाणी विसर्जित करण्यात आली. या रॅली मध्ये परशुराम जयंती उत्सव समितीचे अँड संजय पांडे, संजय आयाचित, पापा ताथोडे, जगदीश कुलकर्णी, अँड. प्रसाद पांडे, संजय नीलेगावकर, सुमुख गोविंदपुरकर, बाळासाहेब देशपांडे, हरिराम कुलकर्णी, सौदती अण्णा, सचिन दिवाण, प्रेम कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अमीत सौदती, अर्थव जोशी, कृष्णा कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, राघवेंद्र देशपांडे, कौस्तुभ जोशी, योगेश उन्हाळे, चैतन्य देशपांडे, भानुदास कुलकर्णी, अनिकेत जोशी, अमीत कुलकर्णी, सुनील देशमुख, प्रवीण देशमुख, रवी पाटील, वसंत जोशी, सौ प्रतिभा कुलकर्णी, सौ आळंदकर, सौ जोशी, सौ कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.

COMMENTS