Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी

माजलगाव प्रतिनिधी - माजलगाव शहरा पासुन 2कि.मी.अंतरावरील राष्ट्रीय महामार्ग 548सीसी वरील शासकिय बीज गुणण केंद्र (सिड फार्म)च्या समोर मोटारसायकल,

उसाच्या ट्रॉलीला डिझेल टँकर धडकून अग्नितांडव!
एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल
औषधी घेऊन जाणारा ट्रक आणि कार मध्ये समोरासमोर धडक ; ट्रक झाला पलटी.

माजलगाव प्रतिनिधी – माजलगाव शहरा पासुन 2कि.मी.अंतरावरील राष्ट्रीय महामार्ग 548सीसी वरील शासकिय बीज गुणण केंद्र (सिड फार्म)च्या समोर मोटारसायकल, इनोव्हा च्या समोरा-समोर झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकल वरुन प्रवास करणारे तीघ जण गंभीर जखमी झाले यात एका 5वर्षीय बालकाचा समावेश आहे. या अपघाता प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार 1जुन गुरुवार रोजीच्या दुपारी 1वा.नमुद राष्ट्रीय महामार्गा वरील उल्लेखित ठिकाणा हुन पुढेच असलेल्या शिवप्रताप मंगल कार्यालया कडे लग्न विधी करता मोटारसायकल क्रं.-एम.एच.-22/एएल-7031वरुन पंढरी अंकुश आघाव (32वर्षे)रा.खैरी ,ता.सेलु,जि.परभणी व महादेव पर्वतराव पोते (50वर्षे)रा.रायगव्हाण, ता.पाथरी,जि.परभणी हे दोघ आणि एक 5वर्षांचा बालक सोबत घेऊन जात असताना पात्रुड,ता.माजलगाव कडुन येणार्‍या इनोव्हा क्रं.एम.एच.-44/वाय-3113ची समोरा-समोर जोरदार धडक बसली. यात मोटारसायकल वरील ऊपरोक्त नामे गंभीर जखमी झाले तर मोटारसायकल चा समोरील भागाचा चुराडा झाला होता आणि त्या दोघांना प्राथमिक उपचारासाठी माजलगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असुन बालक कुठे दाखल केला आहे हे कळाले नाही.

COMMENTS