Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रक्ताचे नमुने बदलण्यात आईचाही सहभाग

नमुने बदलण्यासाठी 50 लाखाचा व्यवहार

पुणे : पुणे पोर्शे कार अपघातात दररोज नव-नवीन खुलासे समोर येत असून, याप्रकरणात अनेकांचा हात असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी, त्य

रमाई घरकुल आवास योजनेचा कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर वंचितचे अजय सरवदे यांच्या प्रयत्नांना यश
 समाजरक्षक पुरस्काराने प्रसाद सुरंजे  सन्मानित
शनिशिंगणापूर येथील शनि मंदीर भाविकांसाठी खुले

पुणे : पुणे पोर्शे कार अपघातात दररोज नव-नवीन खुलासे समोर येत असून, याप्रकरणात अनेकांचा हात असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील आणि आजोबा सध्या अटकेत आहेत. पण या प्रकरणात आरोपीच्या आईचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे. 17 वर्षीय आरोपीच्या आईने मुलाचे रक्त नमुने बदलण्यासाठी स्वतःचे रक्त ससून रुग्णालयाला दिले असल्याचे पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. हे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तब्बल 50 लाखाचा व्यवहार झाला होता. त्यासाठी वॉट्सअप कॉलवर डिल करण्यात आले होते. हा कॉल डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अगरवाल यांच्यात झाल्याची माहिती आता चौकशीत उघड झाली आहे. विशेष म्हणजे एका माजी पोलिस अधिकार्‍यानेही या प्रकरणात हस्तक्षेप करत बचावासाठी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव पोर्शेकारने दोघांना चिरडले. त्यावेळी अल्पवयीन तरूण हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. हे नमुने बदलले जावेत यासाठी त्याच वेळी मोठी डिल करण्यात आली होती. त्यासाठी अल्पवयीन मुलाचा बाप विशाल अगरवार याने डॉक्टर अजय तावरे यांना संपर्क केला होता. तब्बल 15 वेळा या दोघांमध्ये वॉट्सअप संभाषण झाले होते. त्यात 50 लाखांचा व्यवहार या दोघांमध्ये ठरला. त्यानुसार तावरे यांचा सहाय्यक श्रीहरी  हर्नोल याकडे पहिला हप्ता देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार हर्नोल याच्याकडे अडीच लाख कॅश पोचती करण्यात आली. तर शिपाई अतुल घटकांबळे याच्याकडे पन्नास हजाराची रोख रक्कम देण्यात आली. हर्नोल याच्या चौकशीत या बाबी उघड झाल्या आहेत. एकीकडे रक्ताचे नुमने बदलण्यासाठी अनेक घडामोडी घडत होत्या. त्याच वेळी एक माजी पोलीस अधिकारीही या बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याने त्याला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला होता. तसा फोनही त्याने येरवडा पोलीस स्थानकात त्यारात्री केला होता. चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघात झालेल्या पोर्शे कारची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.  

कुणालाही सोडणार नाही ः फडणवीस – पुण्यातील पोर्शे कार अपघातामध्ये सत्ताधारी मंत्री आणि काही आमदारांकडे विरोधकांनी अंगुलीनिर्देश केले आहे. मात्र या प्रकरणात जे आरोपी असतील, तसेच या प्रकरणात ज्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असेल त्यातील कुणालाही सोडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  काही लोक याचे राजकारण करत आहेत. ते कुणाच्या इशार्‍यावर असे करत आहेत हे पण समोर येत आहे. प्रकरण एकीकडे आहे पण या प्रकरणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय डाव खेळला जातो आहे ते पण समोर येत आहे. या सगळ्यांचा पर्दाफाश होईल. तसेच पुण्याच्या प्रकरणात पहिल्या दिवशीही सांगितले होते तेच पुन्हा सांगतो, कुणालाही सोडणार नाही म्हणजे नाही याचा पुनरूच्चार फडणवीस यांनी केला आहे.

COMMENTS