Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारायणी हॉस्पिटल तर्फे गामने मैदानावर उद्या आरोग्यावर मॉर्निंग टीप्स

नाशिक : लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत वाढत जाणार्‍या मधुमेह,हृदयविकार त्याच प्रमाणे इतर आजारांविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी

दोन वर्षीय चिमुकल्‍याच्‍या फुफ्फुसातून काढला नारळाचा तुकडा
नारायणी हॉस्पिटल तर्फे आरोग्यावर मॉर्निंग टीप्स
नारायणी हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

नाशिक : लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत वाढत जाणार्‍या मधुमेह,हृदयविकार त्याच प्रमाणे इतर आजारांविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी नारायणी हॉस्पीटल तर्फे नाशिक शहरातील विविध जॉगिंग ट्रॅक वर मॉर्निंग टीप्स दिल्या जाणार असल्याची माहिती चे प्रसिध्द फिजिशियन डॉ. पंकज राणे, डॉ. स्वप्नील सांखला, डॉ  मनीष चोकशी डॉ.आनंद दिवाण, डॉ. अजय जाधव, डॉ. देविकुमार केळकर, डॉ. दिनेश जोशी यांनी दिली. 

रविवार दि. 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजता मॉर्निंग ग्रूप, गामने ग्राउंड याठिकाणी मॉर्निंग टीप्सची सुरुवात केली जाणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मॉर्निंग ग्रूप चे समन्वयक डाँ. एम. बी. पवार , प्रमोदजी उपाध्ये, अरुण पाटील, अशोक चुंबळे, अहिरे भालचंद्र तसेच गजानन हास्य क्लब.गामणे ग्राऊंडच्या सुनंदा गु.चौधरी, प्रतिभा उपाध्ये, मंजु गायकवाड , मिना येलमामे यांनी केले आहे.

COMMENTS