Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी उत्साहात

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घोषणांनी शहर दणाणले

देवळाली प्रवरा ः हर घर तिरंगा उपक्रमाचा एक भाग म्हणून शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी देवळाली प्रवरा शहरात श्री छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्य

कामगारावरील अन्याय दूर करा अन्यथा आंदोलन ः हर्षदा काकडे
राहुरी लोकन्यायालयात 186 प्रकरणे तडजोडीअंती निकाली
सोशल मीडियाच्या गुरफटलेल्या युवकांना संताचे कार्य  कळणे गरजेचे ;- डॉ.बंडूशेठ भांडकर

देवळाली प्रवरा ः हर घर तिरंगा उपक्रमाचा एक भाग म्हणून शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी देवळाली प्रवरा शहरात श्री छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व जिल्हा परिषद उर्दु शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा हातात घेवून प्रभात फेरी घोषणांनी शहर दणाणून सोडले.
            भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. देशभर आनंदाचे वातावरण आहे. सन 2022 पासून हर घर तिरंगा अभियान सुरु आहे. या अभियानाचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवून प्रत्येक नागरिकाला घरावर तिरंगा ध्वज लावण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज दि.9 ऑगस्ट रोजी देवळाली प्रवरा शहरात श्री छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद उर्दु शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा हातात घेवून प्रभात फेरी काढण्यात आली. देवळाली प्रवरा नगर पालिका कार्यालयाच्या आवारातून काढण्यात आलेल्या या रॅलीला मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी हिरवी झेंडी दाखविला. यावेळी पालिकेचे अधिकारी व शिक्षक उपस्थित होते. प्रभात फेरी दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ लावा, वंदे मातरम, भारत माता की जय, यासह विविध देशभक्तीवर आधारित घोषणामुळे वातावरण देशभक्तीमय झाले होते. यावेळी विद्यार्थी व उपस्थित नागरिकांना लेखापाल कपिल भावसार यांनी सामुहिक शपथ दिली. यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे, प्राचार्य पोपट कडूस, पर्यवेक्षक राजेंद्र भालेकर, आल्हाट, मकरंद रायते, उर्दु शाळेच्या मुख्याध्यापिका नुजहत सय्यद, आसिफ शेख, प्रशासकीय अधिकारी नानासाहेब टिक्कल, संभाजी वाळके, संगणक अभियंता भूषण नवाल, कनिष्ठ अभियंता दिनकर पवार, उदय इंगळे, अजय कासार, विजय साठे, गोरख भांगरे आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन करनिरीक्षक तुषार सुपेकर यांनी केले.  
         

COMMENTS