Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालेगावात 35 हून अधिक घरे आगीत भस्मसात

नाशिक ः नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात भीषण आग लागल्याची घटना घडली असून यात मोठ्या प्रमाणात घरे आणि झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घ

परभणीतील बंदला हिंसक वळण ; संविधान शिल्पाच्या विटंबनेनंतर तणाव
आमचे हात बांधले नाही ,आम्हालाही दगड हातात घेता येतो – राज ठाकरे
राज्यात त्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागली : फडणवीसांचा गौप्यस्फोट

नाशिक ः नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात भीषण आग लागल्याची घटना घडली असून यात मोठ्या प्रमाणात घरे आणि झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग झपाट्याने पसरत गेल्यामुळे सुमारे 35 पेक्षा जास्त झोपड्या आणि घरे अगीच्या विळख्यात सापडून खाक झाले आहेत. ही आग तब्बल 4 तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली असून या आगीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

COMMENTS