Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर 200 पेक्षा अधिक वाहनांना मनाई

परिवहन विभागाची मोहीम; प्रवेश करणार्‍या प्रत्येक वाहनांची तपासणी

मुंबई ः समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आता नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहेत. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न करण्य

समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे आज लोकार्पण
समृद्धी महामार्ग राहणार पाच दिवस बंद
समृद्धी महामार्गावर विश्रांतीसाठी कुठे थांबावे

मुंबई ः समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आता नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहेत. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून परिवहन विभागाच्या वतीने समृद्धी महामार्गावर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. महामार्गावर प्रवेश करणार्‍या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये घासलेल्या टायरच्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांची स्थिती लक्षात न घेताच वाहतूक होत असल्याने परिवहन विभागाच्या वतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहनांचे टायर घासलेली आहेत, अशा वाहनांना समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास रोखण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळेच परिवहन विभागाच्या वतीने समृद्धी महामार्गावर दाखल होणार्‍या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. यामध्ये वाहन चालक दारु पिलेला असल्यास त्याला महामार्गावर जाण्यास बंदी घालण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गोटा टायर म्हणजेच घासलेल्या किंवा गुळगुळीत झालेल्या टायरच्या वाहनांना देखील समृद्धी महामार्गावर प्रवेश नाकारण्यात येत आहे.

COMMENTS