देशात 24 तासात आढळले 17 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात 24 तासात आढळले 17 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 17 हजार 73 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 5 लाखांहून अधिक र

पत्नीने घटस्फोट मागीतला म्हणून पतीने पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले .
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या हस्ते 125 वृक्षांची लागवड….!
वैश्‍विक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारा विद्यार्थी रयतमध्ये घडावा : आ. दिलीप वळसे-पाटील

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 17 हजार 73 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 5 लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात 94 हजारांहून अधिक रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 15 हजार 208 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.57 टक्क्यांवर पोहोचले आहे. यासह आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 27 लाख 87 हजार 606 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 5.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आठवड्यातील रुग्णांचा सकारात्मकता दर 3.39 टक्के आहे. कोरोना साथरोग सुरु झाल्यास आतापर्यंत भारतात 5 लाख 25 हजार 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशव्यापी लसीकरणात रविवारी दिवसभरात 2 लाख 49 हजार 646 कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशात एकूण 197 कोटी 11 लाख 91 हजार 329 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

COMMENTS