तपास यंत्रणांचा मोर्चा शिवसेनेकडे ; यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकरचे छापे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तपास यंत्रणांचा मोर्चा शिवसेनेकडे ; यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकरचे छापे

मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शुक्रवारी प्राप्तिकर विभागाने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी स

23 वर्षांच्या तरुणाचा किक बॉक्सिंग सामन्यादरम्यान मृत्यू !
कोल्हापूरमध्ये ट्रॅपचे आणखी दोन प्रकार उघड; दोन व्यापार्‍यांना 36 लाखाला लुटले
इस्लामपूर शहरातील ट्रॉफीक सिग्नलचे काम सुरु; अनेक दशकाचा प्रलंबीत प्रश्‍न मार्गी : निशिकांत भोसले-पाटील

मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शुक्रवारी प्राप्तिकर विभागाने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी छापे टाकले. सीआरपीएफ जवानांसह प्राप्तिकर विभागाने सकाळीच छापे टाकल्यामुळे खळबळ उडाली. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील माझगाव भागात असलेल्या त्यांच्या घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु करण्यात येत आहे. त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहेत. जाधव यांच्याकडे पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा आहे. जाधवांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा आणखी एका नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचं दिसत आहे. प्राप्तिकर विभागाने विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाधवांवर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनी ईडी- आयकर विभागाला तक्रार केल्यानंतर यशवंत जाधव यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तिला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे.

नील सोमय्यांची जामिनासाठी न्यायालयात धाव
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्या पिता पुत्र यांनी पीएमसी बँक घोटाळयाचे पैसे निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीत गुंतवल्याचा आरोप केला होता. यामध्ये नील सोमय्यांचा हात असल्याचे पुरावे राऊत देणार आहेत. निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सोमय्या यांच्या मालकीची असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. यानंतर नील सोमय्या यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेली. कोर्टात सोमय्यांच्या प्रकरणावर सुनावणी झाली नाही. त्याच प्रमाणे 28 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केले. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी राजेश वाधवान याचे नील सोमय्या यांच्याशी संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या प्रकरणी सोमय्या बाप-बेटे तुरुंगात जातील, असे विधानही राऊतांनी केले. याच प्रकरणी आता नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

महापालिका निवडणुकांमुळेच छापे : संजय राऊत
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील आयकर छापा टाकण्यात आलाय. यावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, महिनाभरात महापालिका निवडणुका असल्याने आयकर विभाग शिपायांच्या घरावरदेखील छापा टाकू शकतात. 2024 पर्यंत आम्हाला हे सहन करायचे आहे. महाराष्ट्रालाही हे सहन करायचे आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ट्विट केले असून ते ठाकरे सरकारच्या डर्टी डझन नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत विविध अधिकार्‍यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS