ओबीसी आरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढणार : अ‍ॅड. आंबेडकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी आरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढणार : अ‍ॅड. आंबेडकर

नागपूर/प्रतिनिधी : ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न आम्ही हाती घेतला असून, त्यासाठी आम्ही विधानसभेवर मोर्चा काढला. आता प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढण्याची आमच

कामगारांनी स्थलांतर करु नये : हसन मुश्रीफ
सुलभ शौचालय महिलांसाठी मोफत करावे
पुण्यात पुन्हा हिट अँड रन; पोलिसाचा मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी : ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न आम्ही हाती घेतला असून, त्यासाठी आम्ही विधानसभेवर मोर्चा काढला. आता प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढण्याची आमची तयारी सुरू आहे. आता ओबीसींना आरक्षणासाठी राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते नागपूरात माध्यमांशी बोलत होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेने आमच्याकडे मते मागायला येऊ नये असे बोर्डच ओबीसींनी आपल्य घरावर लावले पाहिजे. मत हवे असेल तर आमचे आरक्षण आम्हाला परत करा, अशी मागणी ओबीसींनी लावून धरली पाहिजे. ओबीसींना आरक्षण मिळावे आणि या लढ्याला वेग मिळावा म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असे ही यावेळी आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासोबतच मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा जीआर काढण्यात आला होता. मात्र हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. मात्र, मलिक हे 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर बोलत आहेत. ते वस्तुस्थितीला धरून नाही. मलिक यांची भूमिका संघासारखी आहे. मुस्लिमांना आरक्षण मिळू नये अशी संघाची भूमिका आहे. आता मलिकही याच बोटीतून प्रवास करताना दिसत आहे, असा टोला आंबेडकर यांनी लगावला. नवाब मलिक मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत. राष्ट्वादी आणि भाजपचे संबंध जगजाहीर आहेत. नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यामुळे ही भूमिका राष्ट्रवादीची आहे, असेही ते म्हणाले. मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण लागू करावे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. त्यामुळे आता प्रत्येक समाजाने मेळावे घेतले पाहिजे. त्याबाबतची जागृती केली पाहिजे. इम्पिरिकल डेटा का गोळा केला नाही याचा जाब विचारला पाहिजे. सरकारची पोलखोल केली पाहिजे. गोवारी समाजासारखी अवस्था होऊ नये असे ओबीसींना वाटत असेल तर त्यांनी समाजात जागृती केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मुस्लिम आरक्षणप्रश्‍नी मलिकांची भूमिका संघासारखी
राज्यात आरक्षणाचा बट्टयाबोळ झाला असून, चारही पक्षाकडून इथल्या जनतेला फसविण्यात येत आहे. मुस्लिम आरक्षणाचा प्रश्‍न देखील प्रलंबित आहे, मात्र यावर कोणताही नेता खंबीर भूमिका न घेता सोयीस्कर भूमिका घेत आहेत. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते नवाब मलिक यांची मुस्लिम आरक्षणप्रश्‍नी भूमिका योग्य नाही. वस्तुस्थितीला धरून नाही. मलिक यांची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी आहे, अशी टीका वंचित बहुन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

चारही राजकीय पक्षांकडून ओबीसींची फसवणूक
सर्वोच्च न्यायालयातील निर्णय कायम राहिला तर ओबीसींचे राजकीय आरक्षण कायमचे संपुष्टात येऊ शकते. तसेच पुढे शैक्षणिक आणि नोकर्‍यातील आरक्षणही जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. चारही पक्ष ओबीसींची फसवणूक करत आहेत. त्यामुळे ओबीसी ने स्वतःची लढाई स्वतः लढली पाहिजे, असे आवाहनही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले.

COMMENTS