Homeताज्या बातम्यादेश

मान्सून आज केरळमध्ये होणार दाखल

नवी दिल्ली ः गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढत आहे, मात्र या उष्णतेच्या तीव्रतेपासून आता सुटका होणार आहे. मान्सून आज गुरूवारी केरळमध्

नांदेडमध्ये मृत्यूचे तांडव  
महापरिनिर्वाण दिनी सरकारी सुट्टी जाहीर
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु

नवी दिल्ली ः गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढत आहे, मात्र या उष्णतेच्या तीव्रतेपासून आता सुटका होणार आहे. मान्सून आज गुरूवारी केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सून दाखल होण्यासाठी अरबी समुद्र आणि हिंदी महासागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळात दाखल झाल्यानंतर पुढील 10 ते 11 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
सध्या मुंबईत उष्ण वारे वाहत असून विदर्भात उष्णतेची लाट सुरू आहे. मात्र पुढील दोन दिवसांत विदर्भातील तापमान कमी होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा देशामध्ये 106 मिलिमीटर इतका पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना आनंद झाला आहे. कारण उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक मान्सूनची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्‍चिम हिमालयीन भागात दिसणार्‍या पश्‍चिमी विक्षोभामुळे सध्याची उष्णतेसारखी परिस्थिती येत्या काही दिवसांत बदलण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असेही डॉ. कुमार यांनी सांगितले. अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट किंवा लाटेसदृश तापमान आहे. पश्‍चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश इत्यादी भागात आजही तीव्र उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहील. तिथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र गुरुवारपासून उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होण्यास सुरुवात होईल, असे डॉ. कुमार यांनी नमूद केले. तापमानात हळूहळू घट होण्यास सुरुवात होणार असल्यानं पंजाब, हरियाणा, पश्‍चिम हिमालयीन प्रदेशात पावसाच्या शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याने उन्हाळा पूर्ण संपण्यासाठी लोकांना आणखी प्रतीक्षा करावी लागेल. पश्‍चिमी विक्षोभ आणि अरबी समुद्रातून येणार्‍या वार्‍यांमुळं संपूर्ण भारतातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होईल, असंही त्यांनी सांगितलं.

COMMENTS