Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशन

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार ; कांदा दूधाच्या प्रश्‍नांवरून विरोधक घेरणार

मुंबई ः पुढील तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे महायुती सरकारचे शेवटच्या अधिवेशनाला आज गुरूवारपासून सुरूवात होत आहे. लोकसभा

काय झाडी, काय डोंगर….. अजित पवारांकडून शहाजीबापूंची मिमिक्री
अडीच कोटींचे अंमलीपदार्थ जप्त, 21 जणांना अटक
 अहमदनगरच्या नामांतरा विषयी धनगर समाज बांधव आक्रमक

मुंबई ः पुढील तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे महायुती सरकारचे शेवटच्या अधिवेशनाला आज गुरूवारपासून सुरूवात होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच अधिवेशन होत असल्यामुळे विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. कांदा, दूध, कापूस, सोयाबीनचे दर यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी पुन्हा एकदा बहिष्कार टाकला आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. 14 व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. यंदा लोकसभेला विरोधकांना मिळालेली उभारी पाहता अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकारच्या वतीने अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल, तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल.  राज्यात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे यंदाचा अधिवेशनात विरोधकांचा वरचष्मा असण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या प्रश्‍नांना सडेतोड उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ’वर्षा’बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये मध्यरात्री सुमारे 2 तास खलबते झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य विधिमंडळाचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे ते विरोधक व सत्ताधारी यांच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. परिणामी, बंद दाराआडच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, तरतुदी, महत्वाचे मुद्दे, कोणते निर्णय घ्यायचे, विरोधकांच्या प्रश्‍नांना कसे सामोरे जायचे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील राजकारणांसह अनेक महत्वाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीला कसे कोंडीत पकडावे, त्याची रणनीती यावेळी तिन्ही नेत्यांनी निश्‍चित केली. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी महायुतीतील अनेक आमदारांची अपेक्षा होती. पण मंत्रिमंडळांचा विस्तार हा अधिवेशनानंतरच घेतला जाणार असल्याचे महायुतीच्या बैठकीत ठरले आहे.

या मुद्यांचा अधिवेशनात राहणार वरचष्मा –
मराठा विरुद्ध ओबीसी वाद
पुण्यात ड्रग्जचे अड्डे
पॉर्शे अपघात प्रकरण
घाटकोपर फ्लेक्स दुर्घटना

पुणे ड्रग्ज प्रकरण गाजण्याची चिन्हे – आजपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात विरोधक पुणे ड्रग्ज प्रकरणावरून सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणात अधिवेशन रोखून धरणार, असा विश्‍वास ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दाखवला आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज माफिया आणि भाजप सरकार उघडे पडले आहे. पुण्यात यापूर्वीसुद्धा ड्रग्ज प्रकरणे झाली आहेत. काही दिवसांपूर्वी हिट अँड रन प्रकरणसुद्धा ड्रग्ज या विषयातून झाले आहे. त्यामुळे नाटक करण्याचे काम हे सरकार करत आहे. राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरले आहेत, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

COMMENTS