Homeताज्या बातम्यादेश

मोहम्मद फैजल यांना पुन्हा खासदारकी बहाल

लोकसभा सचिवालयाचा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर देशभरात काँगे्रसकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र बुधवारी लोकसभा

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी व्हा – किरण पाटील
जीओचा सर्वात स्वस्त प्लान
उल्हासनगर महापालिकेच्या भूखंडावरील बांधकामावर कारवाई

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर देशभरात काँगे्रसकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र बुधवारी लोकसभा सचिवालयाकडून राष्ट्रवादी काँगे्रसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. तसे पत्र खुद्द लोकसभा सचिवालयाने फैजल यांना दिले आहे.
खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने 11 जानेवारी रोजी फैजल यांचे सदस्यत्व रद्द केले होते. 13 जानेवारी रोजी त्याची अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे नियमानुसार त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करणे गरजेचे होते. तसे न झाल्याने फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच लोकसभा सचिवालयाने आपली चूक सुधारत त्यांना पुन्हा सदस्यत्व बहाल केले आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मोहम्मद फैसल आणि त्यांच्या समर्थकांनी दिवंगत केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचे जावई मोहम्मत सालेह यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी त्यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक न्यायालयाने फैसल यांच्यासह अन्य 3 जणांना 10 वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्या आधारे लोकसभा सचिवालयाने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले होते. केरळ उच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती देऊन दोन महिने उलटल्यानंतरही त्यांना पुन्हा सदस्यत्व बहाल करण्यात आले नव्हते. त्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर काल सुनावणी झाली. पुढील सुनावणी बुधवारी होणार होती. त्याआधीच हा निर्णय आला आहे.

COMMENTS