Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवरेच्या कृषी व संलग्न शास्त्र संस्थेत विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे धडे

लोणी ःलोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी व संलग्न शास्त्र संस्थेत  शिक्षण घेत असलेले विद्य

अहमदनगर जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरु करण्याची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी सारथी निबंध स्पर्धेत प्रथम
लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर यांना पुरस्कार प्रदान 

लोणी ःलोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी व संलग्न शास्त्र संस्थेत  शिक्षण घेत असलेले विद्यार्थी संस्थेच्या परिसरातच नव्याने  निर्माण केलेल्या   कृषीच्या  विविध प्रकल्पातून प्रात्यक्षिकाद्वारे  शिक्षण व  आधुनिक शेतीचे धडे घेत आहेत.
        संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कृषी आधारित शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिकाद्वारे ज्ञान प्राप्त होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रवरा कृषी व संलग्न शास्त्र संस्थेचे संचालक प्रा. डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या  परिसरात विविध कृषी आधारित प्रकल्पांची उभारणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये भाजीपाला व  फुलझाडे रोपवाटिका, हायड्रोफोनिक तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचनावरती भाजीपाला लागवड तंत्रज्ञान आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी कोबी, कॉलीफ्लॉवर, वांगी, झेंडू इ. रोपांची लागवड केलेली असून त्यांना पाणी, खते देणे तसेच कीटकनाशके, बुरशीनाशके फवारणे आदी कामे विद्यार्थी स्वतः अगदी सहजपणे करत आहे. शिवाय विविध फळे, भाजीपाला प्रक्रिया, दुग्भ प्रक्रिया याव्दारे हे विद्यार्धी शिक्षणााांसोबत व्यावसायिकाााांची धडे घेत आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडत असून कौशल्य विकासही होत आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना कृषी आधारित व्यवसाय सुरू करण्यास नक्कीच मदत मिळेल. सदर विविध प्रकल्पांस  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील यांनी नुकतीच भेट देऊन  कृषी व संलग्न संस्था राबवत असलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले आहे. भेटी दरम्यान त्यांनी विद्यार्थी व संबधित शिक्षक वर्गीय अधिकारी यांचेशी संवाद साधला व माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासपूर्वक दिलेल्या माहितीचे त्यांनी कौतूक करून समाधान व्यक्त केले. यावेळी प्रवरा कृषी संलग्न शास्त्र संस्थेचे संचालक  डॉ. उत्तमराव कदम, प्राचार्य डॉ. विशाल केदारी, प्रा. भाऊसाहेब घोरपडे, डॉ. आशिष क्षिरसागर आदी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक  डॉ. उदय पाटील, प्रा. विशाखा देवकर, कृषी सहायक श्री हर्षवर्धन मगर इत्यादींचे मार्गदर्शन लाभत आहे.

COMMENTS