Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयेश पुजारीकडून मोबाईल्स आणि सीमकार्ड जप्त

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्या प्रकरणी नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहात केलेल्या अच

महिला सहकाऱ्याला केसांना पकडून ओढत नेलं, रस्त्यावरच बेदम मारहाण
वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडांच्या ई-लिलावाची प्रक्रिया रखडली
तर, एमपीएससीच्या विरोधात न्यायालयात जावू

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्या प्रकरणी नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहात केलेल्या अचानक तपासणीत जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याच्याकडून यापूर्वीच्या आणि आताच्या गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि सीम कार्ड मिळाल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.  
यामध्ये एक मोबाईल आणि सीम कार्ड 22 मार्चच्या धमकी प्रकरणात वापरले आहे. तर एक सीम कार्ड 14 जानेवारी रोजी वापरलेल्या धमकी प्रकरणातील आहे. आरोपीला ट्रान्झिट वॉरंटवर नागपुरात आणण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गडकरींना धमकी देण्यासाठी एका तरूणीच्या मोबाईलचा उपयोग करण्यात आला होता. तिची विचारपूस केली असता कुठलीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमि आढळली नाही असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. तुरूंगात कडेकोट सुरक्षा असताना गुन्हेगाराला फोन व सीमकार्ड मिळते हे गंभीर आहे. आम्ही स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली आहे.  गेल्या 22 मार्च रोजी बेळगाव तुरूंगातून 10 कोटींची मागणी करणारा फोन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात आला होता. त्याच्या शोधासाठी एक पथक बेळगावला रवाना झाले होते. पथकाने पोहोचल्या नंतर तेथील तुरूंग प्रशासनाच्या मदतीने सर्च ऑपरेशन केले. त्यान मोबाईल व सीमकार्ड सापडले. तपासाच्या दृष्टीने हा मोठा पुरावा असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

COMMENTS