Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसे कार्यकर्त्यांची सिन्नर टोल नाक्यावर तोडफोड

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आ

‘बिग बॉस विजेती टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकीयाचा अपघात
थोरात यांच्या पाठपुराव्यातून मेंगाळ कुटुंबीयांना 10 लाखाची मदत
राज्यस्तरीय आमदार चषक 2023 कबड्डी स्पर्धेचे आयोजन  संपन्न

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेविरोधात संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली. आता या  प्रकरणावर बोलतांना अमित ठाकरे म्हणाले की, टोलनाक्यावर कर्मचार्‍यांनी उद्धट भाषा वापरली. फास्ट टॅग असूनही बराचवेळ गाडी थांबवण्यात आली, टोकनाक्यावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र मॅनेजरसह कर्मचारी उद्धट भाषणे बोलले असा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की मी जेव्हा नाशिकला पोहोचलो तेव्हा मला कळाले टोल नाका फोडला.

COMMENTS