Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील आमदाराच्या मामाचेच अपहरण

पुणे : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे भरदिवसा चौकातून अपहरण करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. टिळेकर यांचे मामा योगेश वाघ फिर

खोपडीतील शेतकर्‍यांना 18 वर्षांनंतर मिळाला जमिनीचा मोबदला  
समाधान ही जीवनातील खरी आनंदनिर्मित कमाई असते – गुलाबराव पादिर
तेलंगणात भारत राष्ट्र समितीच्या खासदारावर चाकू हल्ला

पुणे : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे भरदिवसा चौकातून अपहरण करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. टिळेकर यांचे मामा योगेश वाघ फिरण्यासाठी निघाले असता शेवाळवाडी येथून त्यांचे अपहरण करण्यात आले. एका चारचाही वाहनातून आलेल्या लोकांनी त्यांना गाडीत टाकून नेत त्यांचे अपहरण केले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. टिळेकर यांचे मामाम सतीश वाघ हे सोमवारी सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील एका हॉटेलजवळ थांबले होते. यावेळी एक चारचाकी गाडी त्यांच्याजवळ आली. त्यातून दोघे जण खाली उतरले. दोघांनी सतीश वाघ यांच्याकडे कशाबद्दत तरी विचारपूस करण्याचे नाटक केले. बोलत असतानाच अपहरणकर्त्यांनी सतीश वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर ते निघून गेले. दरम्यान, सतीश वाघ यांचे अपहरण का करण्यात आले? यामागे वैयक्तिक किंवा राजकीय वैमनस्यातून हे कृत्य करण्यात आले का? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. बराच वेळ झाला, तरी सतीश वाघ घरी न आल्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही ते सापडत नसल्याने त्यांच्या मुलाने हडपसर पोलिस ठाणे गाठत पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, पुण्यातील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही. काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या झाली होती. विशेष म्हणजे आरोपींनी त्यांना भरचौकात गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर आज थेट लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाचे भर चौकातून अपहरण करण्यात आले. त्यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर येतांना दिसून येत आहे.

COMMENTS