Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अडीच महिन्यांच्या बाळासह आमदार सरोज अहिरे पोहचल्या विधानभवनात

नागपूर/प्रतिनिधी ः विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपुरात सुरूवात झाली आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांविरोधात आक्रमक होत असतांना व

विद्यापीठ खेळाडूंना पुन्हा 25 वर्षाची अट; कोरोनामुळे दिलेली सवलत खंडित
कृषी कंन्याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
फलटण येथे जुगार अड्ड्यावर छापा; पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त

नागपूर/प्रतिनिधी ः विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपुरात सुरूवात झाली आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांविरोधात आक्रमक होत असतांना विधानभवन परिसरात एक वेगळीच चर्चा सुरू होती. नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे  यांच्याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. त्यांच्या एका कृतीचं खूप कौतुक होत आहे. कारण अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन सरोज अहिरेंनी विधानभवनाच्या अधिवेशनाला हजेरी लावली.
नाशिक जिल्ह्यातील आमदार सरोज अहिरे यांचा मुलगा प्रशंसक त्यांच्याशिवाय राहत नाही. त्यामुळे बाळाला घेऊनच त्या विधानभवनात आल्या. विधानभवनातील लहान बाळांसाठी असलेल्या विशेष कक्षामध्ये प्रशंसकला ठेवून सरोज अहिरे विधानसभेच्या कामाची सुरुवात केली. मतदारसंघातले प्रश्‍न विधानसभेत मांडणे आवश्यक आहे. दुसरीकडे बाळाची जबाबदारीही आहे. ही दोन्ही कर्तव्य सरोज अहिरे यांनी एकत्र बजावली आहेत. सरोज अहिरे म्हणाल्या की, कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांमध्ये नागपूरमध्ये अधिवेशन झालेले नाही. मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्‍नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन आले अशी प्रतिक्रिया अहिरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. प्रशंसक वाघ असे बाळाचे नाव आहे. प्रशंसकचा जन्म 30 सप्टेंबरला झाला. त्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसोबत विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्‍न मांडणार आहे, असे त्या म्हणाल्या.

COMMENTS