मुंबई ः शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ

मुंबई ः शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे सिद्धिविनायक न्यासाची जबाबदारी होती. सदा सरवणकर दादर-माहिम मतदारसंघातून आमदार आहेत. शिंदे गटाच्या बंडावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकरांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याच निष्ठेचं फळ त्यांना मिळाल्याची चर्चा आहे. शिवसेनेत सदा सरवणकर यांनी अनेक महत्त्वाच पदे भूषवली आहेत. शिंदेंसोबत आल्यानंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यासच्या अध्यक्षपदाची संधी त्यांना मिळाली आहे.
COMMENTS