Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिंचन विहिरींसाठी आणि अधिकार्‍यांवरील कारवाई विरोधात आमदार रोहित पवार यांनी दंड थोपटत दिला आंदोलनाचा इशारा

जामखेड ः  राजकीय दृष्टीकोनातून सुमारे 7 हजार सिंचन विहीरींच्या कामांत आणल्या जाणार्‍या अडथळ्यांविरोधात आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकासमंत्री गि

रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
जामखेड-सौताडा 548-डी राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम
भाजपकडून बहुजन ओबीसी नेत्याची ताकत कमी करण्याच काम : Rohit Pawar

जामखेड ः  राजकीय दृष्टीकोनातून सुमारे 7 हजार सिंचन विहीरींच्या कामांत आणल्या जाणार्‍या अडथळ्यांविरोधात आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन ही कामे सुरळीत सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. अन्यथा अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर हजारो शेतकर्‍यांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.. तसेच चौकशीच्या नावाखाली अधिकार्‍यांना त्रास देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या काही महिन्यांत शेतकरी आणि प्रशासनाला विश्‍वासात घेऊन सुमारे 7 हजार सिंचन विहिरींची कामे मंजूर करुन आणली आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अनुदानाच्या माध्यमातून 280 कोटी रुपये जमा होणार आहेत. परंतु राजकीय दृष्टीकोनातून या कामांमध्ये सध्या अडथळे आणले जात असून त्यांची चौकशी सुरु केली आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने सिंचन विहिरींची कामे वेळेत पूर्ण झाल्यास त्याचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे. परंतु केवळ राजकीय हेतूने या कामांमध्ये अडथळे आणले जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि विहिरींची कामे कोणत्याही अडथळ्यांविना सुरु ठेवण्याची मागणी केली. अन्यथा अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर शेतकर्‍यांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याशिवाय कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या काही वर्षांपूर्वी अधिकारी आणि कर्मचारी बदलून येण्यास तयार नव्हते. परंतु आमदार रोहित पवार यांनी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेऊन विकासाच्यादृष्टीने मतदारसंघात एक चांगले वातावरण निर्माण केले. त्यामुळे विकासामांनाही गती आली. फळबाग, गायगोठे, शेळी शेड अशी वैयक्तिक लाभाची कामे तसेच जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत, पानंद रस्ते, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, राजीव गांधी सेवा केंद्र, बचत भवन, हॉस्पिटल अशा प्रकारची सार्वजनिक लोकहिताची अनेक कामे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या मदतीने आमदार रोहित पवार यांनी सुरु केली आहेत.  वास्तविक चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई केली जात असेल तर मतदारसंघाच्या विकासाला ब्रेक लागतो. त्यामुळे केवळ राजकीय दृष्टीकोनातून कोणत्याही अधिकारी व कर्मचार्‍यांना चौकशीच्या नावाखाली त्रास देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांना केली
——–

“केवळ राजकीय हेतूतून शेतकर्‍यांच्या 7 हजार सिंचन विहिरींच्या कामात अडथळे आणले जात असून अधिकार्‍यांनाही जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. ही बाब मंत्रिमहोदयांना सांगितली आणि विहिरींची ही कामे कोणत्याही अडथळ्याविना सुरु रहावीत तसेच चौकशीच्या नावाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांना त्रास देऊ नये, अशी विनंती केली. विकासकामात मी नेहमी शेतकरी आणि अधिकार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. विकासकामांत अडथळा आणल्यास शेतकर्‍यांसोबत तीव्र आंदोलन केले जाईल, याची विरोधकांनी नोंद घ्यावी.
रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

COMMENTS