Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार रोहित पवारांनीच मनोज जरांगेंना केले ओबीसींच्या विरोधात उभे !

अहिल्यानगर : राज्यात विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण चांगलेच तापतांना दिसून येत आहे. मात्र या राजकारणाला जातीय संघर्षाची किनार देखील दिसू

अखेर तिस्ता सेटलवाडला जामीन मंजूर
सिव्हील निलंबन कारवाई निषेधार्थ काम बंद आंदोलन
फौजदाराचे घर भरदिवसा फोडून लाखोंची चोरी | DAINIK LOKMNTHAN

अहिल्यानगर : राज्यात विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण चांगलेच तापतांना दिसून येत आहे. मात्र या राजकारणाला जातीय संघर्षाची किनार देखील दिसून येत आहे. मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी ओबीसीविरूद्ध उभे करणारे कोण ? हे आता लपून राहिलेले नाही. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा मनोज जरांगे यांना ओबीसीविरूद्ध उभे करण्यास मोठा हात असल्याचे दिसून येत आहे. किंबहूना मनोज जरांगे यांना उभे करून मराठा विरूद्ध ओबीसी असा नवा संघर्ष उभा करण्यात रोहित पवारांचा मोठा पुढाकार असल्याचे त्यांच्या गेल्या काही महिन्यापूर्वींच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रोहित पवारांनी काही महिन्यापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळांविरोधात वक्तव्य करून आपला ओबीसीद्रोह काही महिन्यापूर्वीच सिद्ध केला आहे. खरंतर 3 डिसेंबर 2023 नंतर काय होईल मला सांगता येणार नाही, सदर विधान रोहित पवारांनी बीड येथील बीडमध्ये सत्तेतल्या लोकांनी ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर केले होते. त्यांचे संपूर्ण वक्तव्य उपलब्ध असून त्याचा अभ्यास केल्यास रोहित पवारांचा ओबीसीद्वेष आणि मनोज जरांगेंच्या आडून हा संघर्ष मोठा करण्यात मोठा हात असल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता आमदार या नात्याने रोहित पवारांनी ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाचे प्रश्‍न समजून घेण्याची गरज होती. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी रोहित पवारांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात केलेली वक्तव्ये असतील, यावरून रोहित पवारांनी मराठा विरूद्ध ओबीसी या संघर्षाला खतपाणीच घातल्याचे दिसून येत आहे. यासोबतच विधानसभा निवडणुकीत त्यांनी या संघर्षाचा फायदा घेण्यासाठी मराठा उमेदवारांना ओबीसी उमेदवारांच्या विरोधात उभे केल्याचे दिसून येत आहे. खरंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात भूमिपत्र विरुद्ध उपरा असा नवा वाद डोके वर काढताना दिसत आहे. एमआयडीसी आणण्यावरून आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मात्र जनतेला सर्वसमावेशक आमदार हवा आहे. जो सर्व जाती-धर्मांच्या जनतेला सोबत घेवून काम करेल, सर्वांचे प्रश्‍न सोडवेल. सन 2019 ला शरदचंद्र पवार यांचा नातू म्हणून जामखेड-कर्जतमधील लोकांनी रोहित पवारांना आमदार म्हणून निवडून दिले. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे कुकडीचे पाणी एमआयडीसी, रोजगार, शिक्षण आदी मूद्दायावर रोहित पवार काम करतील असे वाटले होते. मात्र लोकांची पूर्ण निराशा झाली. परक्याने केला नाही तो विकास आपला भूमिपुत्र करीन, या विश्‍वासाने व आपलेपणामुळे दूर गेलेली माणसे दुसर्‍या उमेदवाराच्या शोधात आहे. शिवाय जनतेला मराठा-ओबीसी संघर्षाशी काहीही घेणे देणे नाही. त्यांचे दररोजच्या जगण्यातील प्रश्‍न सुटले पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, मुलांना चांगले शिक्षण, आरोग्य या सुविधा मिळाल्या पाहिजेत, याकडेच मतदारराजांचा ओढा दिसून येत आहे.

COMMENTS