Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार राणेंची मतदारांना धमकी

माझ्या विचारांचा सरपंच निवडून न आल्यास निधी देणार नाही

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - कणकवली जिल्ह्यातील नांदगावमध्ये ग्रामपंचायतीच्या प्रचारादरम्यान भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी मतदारांना धमकी दिली आहे. मा

भारत जोडो यात्रेत दिसणारे जे कलाकार आहेत त्यांना पैसे देऊन आणले आहे 
“यह आमदार काम का भी और कामदार भी” राज्यपालांकडून कौतुक.
संजय राऊत कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा – नितेश राणे (Video)

सिंधुदुर्ग प्रतिनिधी – कणकवली जिल्ह्यातील नांदगावमध्ये ग्रामपंचायतीच्या प्रचारादरम्यान भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी मतदारांना धमकी दिली आहे. माझ्या विचाराचा सरपंच निवडून दिला नाही तर मुख्यमंत्री देखील मला विचारल्याशिवाय तुम्हाला निधी देणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि याला धमकी नाहीतर अन्य काही समजा असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपचे आमदार नीतेश राणे म्हणाले की, चुकून पण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही, तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही, ऐवढी काळजी मी निश्‍चितपणे घेईल, अशी धमकी मतदारांना आणि गावकर्‍यांना दिली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचार सुरू असताना ते बोलत होते. आता तुम्ही धमकी समजा हे समजा काही समजा पण आपले गणित स्पष्ट आहे. भाजप आमदार नीतेश राणे म्हणाले की, त्यामुळे मतदान करताना आता नीट विचार करा, कारण आता निधी वाटप माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी असो, ग्रामविकासचा निधी असो की 25 पंधराचा निधी असो, केंद्र सरकारचा निधी असो, कारण मी सत्तेत असलेला आमदार आहे. पालकमंत्री असो की जिल्हाधिकारी असो संबंधित कुठलाही मंत्री असो उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असतील कुणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाही, अशी धमकीच भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी नांदगावच्या मतदारांना दिली आहे. याआधीही भाजप आमदार नीतेश राणे यांच्याकडून भाजपचा सरपंच निवडून आणण्यासाठी चक्क पन्नास लाख रुपयांची ऑफर दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरला झाला होता. यात त्यांनी भाजपाची बिनविरोध ग्रामपंचायत येईल त्या गावाला 50 लाखाचा निधी देऊ अशी घोषणाच केली होती.

COMMENTS