Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावपासून राज्याच्या राजकारणापर्यंतचा ज्ञानी नेता गमावला : आ. राजळे

 पाथर्डी : गावच्या राजकारणापासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत परिपूर्ण ज्ञान असलेला असा नेता म्हणून स्व.अजित पवार यांची ओळख आहे. त्यांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले असून त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. त्या लोकनेते आप्पासाहेब राजळे सभागृहात  उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांना सर्वपक्षिय श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेत बोलत होत्या.  या सभेस आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्रताप ढाकणे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्षा मंगलताई कोकाटे, उद्धव वाघ, सुभाष बर्डे, भगवान दराडे, भगवानराव बांगर, धनंजय बडे, नासिर शेख, रामकिसन काकडे, नंदकुमार शेळके, बजरंग घोडके, बंडू बोरुडे, प्रतीक खेडकर, अमोल गर्जे,अजिनाथ मोरे,प्रतिक नांगरे,डॉ.रमेश हंडाळ, दिनकर पालवे,अशोक चोरमले, बाबा राजगुरू, सतीश गुगळे, कुशल भापसे,भगवान आव्हाड,सचिन वायकर,योगेश रासने,अंकुश चितळे, काशीबाई गोल्हार, सिंधुताई साठे, डॉ.शारदा गर्जे,सविता भापकर,मनीषा उदमले,रेखा हंडाळ,मंगल सोनटक्के, ज्योती शर्मा, अर्चना फासे हे उपस्थित होते.  पुढे बोलताना राजळे म्हणाल्या की, राज्याच्या जडणघडणीत जेष्ठ नेते शरद पवार, स्व.अजित पवार  यांचा मोठा वाटा असून अजित पवार हे विविध खात्यांचे मंत्री असताना त्यांनी आपल्या मतदार संघाला मोठा निधी दिला. दादांची उणीव भरून निघणारी नसून महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. १० वर्षात प्रचंड आत्मविश्वासाने काम दादा करत होते. स्व.राजीव राजळे पराभूत झाल्यानंतर त्यांना धीर देण्याचे काम पवार यांनी केले होते.   यावेळी बोलताना प्रताप ढाकणे यांनी म्हटले की,अजित पवार हे आधुनिक काळातील कर्मयोगी होते. विकासकामे करताना त्यांनी पक्षीय राजकारणाचा कधीही विचार केला नाही. लोकांविषयी अतोनात प्रेम असलेला हळवा व संवेदनशील मनाचा आणि ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला असा नेता पुन्हा होणार नाही. पवार कुटुंबाने कायम तालुक्याला न्याय देण्याची भूमिका घेतली. ढाकणे व राजळे या दोन्हीही घराण्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. अडचणीच्या काळात मदत करणारा नेता याचा अनुभव माझ्यासह अनेकांनी  घेतला आहे. 

शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटमधील फसवणुकीची चौकशी करा
मताचे राजकारण करणार नाही – मोनिकाताई राजळे
पाथर्डी व शेवगावांतील पिकांचे पंचनामे करावेत

 पाथर्डी : गावच्या राजकारणापासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत परिपूर्ण ज्ञान असलेला असा नेता म्हणून स्व.अजित पवार यांची ओळख आहे. त्यांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले असून त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. त्या लोकनेते आप्पासाहेब राजळे सभागृहात  उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांना सर्वपक्षिय श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेत बोलत होत्या.

 या सभेस आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्रताप ढाकणे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्षा मंगलताई कोकाटे, उद्धव वाघ, सुभाष बर्डे, भगवान दराडे, भगवानराव बांगर, धनंजय बडे, नासिर शेख, रामकिसन काकडे, नंदकुमार शेळके, बजरंग घोडके, बंडू बोरुडे, प्रतीक खेडकर, अमोल गर्जे,अजिनाथ मोरे,प्रतिक नांगरे,डॉ.रमेश हंडाळ, दिनकर पालवे,अशोक चोरमले, बाबा राजगुरू, सतीश गुगळे, कुशल भापसे,भगवान आव्हाड,सचिन वायकर,योगेश रासने,अंकुश चितळे, काशीबाई गोल्हार, सिंधुताई साठे, डॉ.शारदा गर्जे,सविता भापकर,मनीषा उदमले,रेखा हंडाळ,मंगल सोनटक्के, ज्योती शर्मा, अर्चना फासे हे उपस्थित होते. 

पुढे बोलताना राजळे म्हणाल्या की, राज्याच्या जडणघडणीत जेष्ठ नेते शरद पवार, स्व.अजित पवार  यांचा मोठा वाटा असून अजित पवार हे विविध खात्यांचे मंत्री असताना त्यांनी आपल्या मतदार संघाला मोठा निधी दिला. दादांची उणीव भरून निघणारी नसून महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. १० वर्षात प्रचंड आत्मविश्वासाने काम दादा करत होते. स्व.राजीव राजळे पराभूत झाल्यानंतर त्यांना धीर देण्याचे काम पवार यांनी केले होते. 

 यावेळी बोलताना प्रताप ढाकणे यांनी म्हटले की,अजित पवार हे आधुनिक काळातील कर्मयोगी होते. विकासकामे करताना त्यांनी पक्षीय राजकारणाचा कधीही विचार केला नाही. लोकांविषयी अतोनात प्रेम असलेला हळवा व संवेदनशील मनाचा आणि ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला असा नेता पुन्हा होणार नाही. पवार कुटुंबाने कायम तालुक्याला न्याय देण्याची भूमिका घेतली. ढाकणे व राजळे या दोन्हीही घराण्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. अडचणीच्या काळात मदत करणारा नेता याचा अनुभव माझ्यासह अनेकांनी  घेतला आहे. 

COMMENTS