आमदार काळेंनी करवाढ संदर्भात घेतलेली भूमिका योग्य : डॉ. अजय गर्जे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार काळेंनी करवाढ संदर्भात घेतलेली भूमिका योग्य : डॉ. अजय गर्जे

कोपरगाव प्रतिनिधी :- चुकीच्या सर्वेच्या आधारे कोपरगाव नगरपरिषदेने केलेली करवाढ देखील चुकीची आहे. हे आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या बैठकीत मुख्याधि

संस्थेचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्काराने सुखावलो : रामकृष्ण भिंगारे
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी संगीत आखाडी (बोहडा) लिंगदेव गावामध्ये मध्ये संपन्न
पैसे दाम दुप्पट करण्याचें आमिष दाखवून व्यावसायिकाची दहा लाख रुपयांची फसवणूक

कोपरगाव प्रतिनिधी :- चुकीच्या सर्वेच्या आधारे कोपरगाव नगरपरिषदेने केलेली करवाढ देखील चुकीची आहे. हे आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या बैठकीत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी कबूल केले आहे. त्यामुळे करण्यात आलेली चुकीची करवाढ कमी करण्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेला आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रशासन योग्य पद्धतीने पाठपुरावा करीत असून करवाढ संदर्भात आ. आशुतोष काळेंनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे माजी नगरसेवक डॉ. अजय गर्जे यांनी म्हटले आहे.
डॉ. गर्जे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहरातील नागरिकांच्या मालमत्तांवर अवास्तव कर वाढ करून नागरिकांना आर्थिक संकटात लोटले होते. मात्र आ. आशुतोष काळे यांनी याबाबत वारंवार घेतलेल्या बैठका व झालेली कर वाढ कमी करण्याबाबत घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे खाजगी कंपनीकडून करण्यात आलेला सर्व्हे चुकीचा झाला असल्याचे मान्य करतांना ज्या नागरिकांच्या हरकती आहेत व जे नागरिक हरकती घेवू शकले नाहीत त्या सर्व मालमत्तांचे फेर सर्व्हे करण्यात येतील हे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सांगितले आहे. तसेच या चुकीच्या झालेल्या सर्व्हेमध्ये घरगुती मालमत्तांना व्यवसायिक मालमता दाखविण्यात आले होते. त्यामुळे जास्त कर आकारणी झाली होती. कोपरगाव नगरपरिषदेने आकारलेल्या या चुकीच्या करवाढीबाबत आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना व्यावसायिक मालमत्ता आणि घरगुती मालमत्ता यांचे विभाजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनेनुसार व्यावसायिक मालमत्ता आणि घरगुती मालमत्तांचे विभाजन होवून ज्या घरगुती मालमत्तांवर व्यवसायिक कर लावण्यात आला होता त्यामध्ये दुरुस्ती होवून झालेली करवाढ कमी होणार आहे. हा दुरुस्ती अहवाल कोपरगाव नगरपरिषद प्रशासन सबंधित विभागाकडे दाखल करणार असून नागरिकांना चुकीच्या करवाढीतून नक्कीच दिलासा मिळेल.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये असे आवाहन डॉ. अजय गर्जे यांनी केले आहे.

COMMENTS