Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार काळेंची कोपरगावची बाजारपेठ फुलण्यास मदत : सुनील बोरा

आशुतोष काळे यांची विकासदृष्टी असून त्यामुळेच कोपरगाव शहराची बाजारपेठ पुन्हा फुलण्यास मोठी मदत झाली आहे.  

कोपरगाव प्रतिनिधी :-  कोपरगाव शहरातील खराब रस्त्यांमुळे कोपरगावला कुचेष्टेने धुळगाव असे संबोधले जात होते. त्याबरोबरच इतरही समस्या असल्यामुळे कोप

विकासकामांना आडवे आला तर सोडणार नाही
आमदार काळेंच्या वाढदिवसानिमित्त तळेगांव -मळे येथे वृक्षरोपण.
शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पिक विम्याचे निकष बदला

कोपरगाव प्रतिनिधी :-  कोपरगाव शहरातील खराब रस्त्यांमुळे कोपरगावला कुचेष्टेने धुळगाव असे संबोधले जात होते. त्याबरोबरच इतरही समस्या असल्यामुळे कोपरगाव शहरात खरेदीसाठी येतांना नागरिक नाक मुरडत होते. त्यामुळे मागील काही वर्षापासून कोपरगाव शहराची बाजार पेठ ओस पडली होती. मात्र आ. आशुतोष काळे यांनी शहरासाठी दिलेल्या निधीतून अनेक प्रश्‍न मार्गी लागले असून त्यांच्या विकास दृष्टीतून कोपरगावची बाजारपेठ फुलण्यास मदत झाली असल्याचे कोपरगाव शहारतील प्रसिद्ध व्यापारी सुनील बोरा यांनी म्हटले आहे.
बोरा यांनी पुढे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील खराब रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची समस्या हे कोपरगाव शहराच्या विकासातील मोठे अडसर होते. त्यामुळे कोपरगाव शहरातील व्यापार ठप्प होवून आर्थिक उलाढाल मंदावली होती. कोपरगाव तालुक्यात असलेले दोन दिग्ग्गज साखर कारखाने, नामांकित दुध संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शैक्षणिक संस्थानचे जाळे असून देखील या सर्व संस्थाच्या माध्यमातून कर्मचार्‍यांच्या पगारापोटी बाहेर येणारे कोट्यावधीचे चलन हे कोपरगाव शहराच्या बाजार पेठेत खर्च होत नव्हते. ते शेजारच्या शहरात खर्चिले जावून त्या शहरांची आर्थिक उलाढाल वाढली होती. त्याचा फटका कोपरगाव शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसून बाजारपेठेला मरगळ आली होती. मात्र आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी भरघोस निधी देतांना शहराच्या विकासाचा मुख्य अडसर असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न 5 नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून मार्गी लावला असून शहरातील रस्त्यांसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे शहारतील रस्ते धूळमुक्त झाले असून शहराच्या बाहेरील नागरिकांचा शहरात येण्याचा ओघ हा निश्‍चितपणे वाढला आहे. त्याचा परिणाम व्यवसाय वाढीसाठी झाला आहे. रस्ते, पाणी आणि व्यापारी संकुल हे व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. व्यवसाय वाढीसाठी याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहे. हे महत्वाचे विषय आ.आशुतोष काळे यांनी मार्गी लावल्यामुळे ग्राहकांना सोयी सुविधा मिळत असून येणार्‍या दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक नक्कीच कोपरगाव शहराला पसंती  देतील. हे मागील काही महिन्यांपासून होत असलेल्या आर्थिक उलाढालीवरून जाणवत आहे. मात्र यामागे आ. आशुतोष काळे यांची विकासदृष्टी असून त्यामुळेच कोपरगाव शहराची बाजारपेठ पुन्हा फुलण्यास मोठी मदत झाली आहे.  

COMMENTS