मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असून, याप्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच फैसला सुन

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असून, याप्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच फैसला सुनावण्याची शक्यता आहे. कारण नार्वेकर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदाराची दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाई पुन्हा वेग घेणार आहे. पुढील आठवड्यात शिंदे गटातील आमदारांची म्हणणे मांडण्याची मुदत संपणार आहे. याआधी विधानसभा अध्यक्षांनी 2 आठवड्यांची मुदत दिली होती. ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी याआधीच लेखी उत्तर सादर केले होते, अशी माहिती विधीमंडळातील सूत्रांनी दिली आहे. यामुळे आता शिवसेनेच्या प्रत्येक आमदारांची सुनावणी होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यापासून आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाच्या 14 आमदारांपासून सुनावणीला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दररोज एका आमदाराची सुनावणी होणार आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये दोन्ही गटाच्या आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. तसेच ठराविक कालावधीत आपले उत्तर सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांकडून राहुल नार्वेकर यांच्या नोटीसला उत्तर सादर करण्यात आले होते. दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी नोटीसल उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशनाचे कारण सांगून शिंदे गटाच्या आमदारांनी वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांची मागणी मान्य केली होती.
ठाकरे गटाच्या आमदारांची आधी सुनावणी ? – ठाकरे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केले असल्याने आता त्यांची आधी सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष प्रत्येक आमदाराचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्यानुसार, राहुल नार्वेकर दररोज एका आमदाराचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. या दरम्यानच्या काळात शिंदे गटाकडून आपले लेखी म्हणणे विधानसभा अध्यक्षांकडे मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांचीदेखील प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.
COMMENTS