Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू ः खा. शरद पवार

ईडीची कारवाई भाजप नेत्यावर होत नसल्याकडे वेधले लक्ष

पुणे ः तपास यंत्रणांचा राज्यातच नव्हे तर देशभर भाजपकडून गैरवापर करण्यात येत आहे. ईडीच्या माध्यमातून पक्ष फोडून राजकारण करण्यात येत आहे. गेल्या का

शरद पवारांना नागालँडमध्येही धक्का
केजरीवालांची अटक भाजपवरच उलटणार
वय काढू नका, हा गडी थांबणार नाही

पुणे ः तपास यंत्रणांचा राज्यातच नव्हे तर देशभर भाजपकडून गैरवापर करण्यात येत आहे. ईडीच्या माध्यमातून पक्ष फोडून राजकारण करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये 18,147 नेत्यांची ईडीने चौकशी केली. यापैकी 85 टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून ईडीचा हत्यारासारखा वापर होत आहे. भाजपच्या काळात 121 नेत्यांवर ईडीची कारवाई झाली. परंतु, ईडीने कारवाई केलेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, भाजप सातत्याने सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका खासदार शरद पवार यांनी केली. रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

यावेळी बोलतांना पवार हणाले की, भाजपकडून सत्तेचा वापर करताना देशात काही धोरणे राबवली जात आहेत. ही धोरणे सामाजिक ऐक्याला धक्का देणारी आहेत. नुकतेच लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज संपले. पंतप्रधान मोदी यांचे राज्यसभेतील भाषण ऐकले असेल. त्यांनी आपल्या भाषणात काय सांगितले? पंतप्रधानांनी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींनी स्वातंत्र्य आंदोलनात 13 वर्षे तुरुंगात काढली. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले. देशाला लोकशाही शासन दिले त्या लोकांवर व्यक्तिगत हल्ले करुन पंतप्रधान मोदी यांनी काय साधले?, असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. ज्या लोकांनी देशाला विचार दिला आणि दिशा दाखवली त्यांच्यावर टीका करणे आजच्या राज्यकर्त्यांची भूमिका आहे. हे शहाणपणाचे लक्षण नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आजघडीला देशात कोणीही भाजपच्या विचाराच्या विरोधात भूमिका घेतली की त्याच्याविरोधात सत्तेचा गैरवापर केला जातो. यापूर्वी महाराष्ट्रात ईडी हा शब्द कोणालाही माहिती नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. या काळात ईडीचा गैरवापर झाला. 2014 ते 2023 या काळात ईडीकडून एकूण सहा हजार केसेस नोंदवण्यात आल्या, त्यापैकी केवळ 25 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आल्याचे देखील पवार यांनी यावेळी सांगितले.

चिन्ह नाही तर काम आणि विचार महत्वाचा – मी पहिली निवडणूक दोन बैलजोडीच्या चिन्हावर लढलो. आमचे चिन्हे गेले, मग आम्ही चरख्यावर लढलो. त्यानंतर आम्ही हातावर लढलो, ते गेल्यानंतर घड्याळ चिन्ह आले. त्यामुळे लोकांचा दृष्टीने काम, विचार हा महत्वाचा असतो. चिन्ह मर्यादित काळासाठी उपयुक्त असते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी प्रथम निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दिली आहे.

निवडणूक आयोगाचा निकाल आश्‍चर्यकारक – निवडणूक आयोगाचा निकाल आश्‍चर्यकारक आहे. आमचे चिन्हच घेतले नाही तर पक्षच काढून घेतला. ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी उभारी दिली, त्यांच्या हातातून पक्ष काढून दुसर्‍याला देणे, असा प्रकार या देशामध्ये या आधी कधी झाला नव्हता. ते सुद्धा निवडणूक आयोगाने करुन दाखवले. माझी खात्री आहे, लोक या गोष्टीला समर्थन देणार नाहीत, असे शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, आणि त्यासंबंधीचे निर्णय लवकर येतील अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले.

राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडल्याचा दावा चुकीचा – राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेल्याचा काही लोक सांगत आहेत. मात्र, हा दावा अजिबात सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूक आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

COMMENTS