जामखेड ः जामखेड बस आगारातील बस वेळेवर येत नसल्याने शालेय मूलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. जवळका येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्

जामखेड ः जामखेड बस आगारातील बस वेळेवर येत नसल्याने शालेय मूलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. जवळका येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एस टी बस वेळेवर येत नाही. रोजच्या या समस्येमुळे जवळका येथील संतापलेल्या शालेय मुले-मुली व ग्रामस्थांनी 13 ऑगस्ट रोजी जामखेड येथील एसटी डेपोत ठिय्या आंदोलन केले. या घटनेने तालुक्यातील अनेक ठिकाणी बस वेळेवर सूटत नसल्याने ग्रामस्थ व विद्यार्थी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांनी सांगितले. जवळका येथून 8 किमी अंतरावर नान्नज येथे जाण्यासाठी वेळेवर बसत येत नाही. शनिवारी तर बसच येतच नाही. विद्यार्थ्यांना जवळका बस स्टँडवर 2-3 तास बसची वाट पाहत बसावे लागते.
कधी कधी एसटी बसच येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा देखील बुडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच बरोबर शाळा सुटल्यानंतर देखील नान्नजहुन जवळका येथे जाण्यासाठी बस उशिरा जात असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या घरी वाडीवस्तीवर जाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर पायी अंधारातच जावे लागते.असे विद्यार्थ्यांनी सांगितले. एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत लवकर एसटी सोडा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जवळका ग्रामस्थांनी दिला तसेच आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनी या जवळका एसटी बसचा प्रश्न लक्ष घालून तातडीने वेळेवर बस कशी येईल याकडे लक्ष घालावे अशीही मागणी जवळका येथील ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी जवळका येथील शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष वाळुंजकर, बाबुरावान तात्या वाळुंजकर, कांतीलाल वाळुंजकर, सुदाम वाळुंजकर, गौतम बोराडे, लक्ष्मण खोसे, वर्धमान बोराडे, संभाजी देशमुख, लक्ष्मण वाळुंजकर सह विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डिझेल अभावी एसटी बंद अन् अधिकारी कागदोपत्री कामावर खूश – जामखेड येथील एसटी आगारातून डिझेल अभावी बस सेवा बंद होण्याचा प्रकार वारंवार होत आहे. त्यामुळे प्रवाशी विद्यार्थी ग्रामस्थ तसेच एसटी कामगारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नूकतेच अहमदनगर विभागीय नियंत्रक यांनी एक पत्र आगारांना पाठविले आहे त्यामध्ये म्हटले आहे की माहे जुलै 2024 महिन्यात 1 कोटी 03 लांख नफ्यामध्ये आल्याने अहमदनगर विभागातील सर्व आगारातील कर्मचारी व अधिकारी यांनी अथक परिश्रम घेवून सर्वतोपरी प्रयत्न केले. याबद्दल विभाग नियंत्रकांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. यावरून विभाग नियंत्रक फक्त व्यवसाय वाढीकडे लक्ष देतात मात्र प्रत्यक्षात प्रवाशांना तसेच एसटी कर्मचार्यांना काय त्रास होतो आहे याबाबत आलेल्या तक्रारीनिवारणाबाबत अजिबात लक्ष देत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
COMMENTS