Homeताज्या बातम्यामनोरंजन

उर्फी जावेदसोबत फ्लाइटमध्ये गैरवर्तन

नशेत असलेल्या मुलांनी केलं धक्कादायक कृत्य

मुंबई प्रतिनिधी - उर्फी जावेद ही तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करताना दिसत

उर्फी जावेदवर भडकले प्रसिद्ध कॉमेडियन
हार्ट कट ड्रेसमुळे उर्फी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
उर्फी जावेद प्रकरणावरुन भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी ?

मुंबई प्रतिनिधी – उर्फी जावेद ही तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करताना दिसते. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे उर्फी चर्चेत आली होती. मात्र, आता उर्फी चर्चेत येण्याचं कारण तिचा व्हायरल व्हिडीओ किंवा विचित्र फॅशन नाही तर काही वेगळंच आहे. उर्फीनं तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचं म्हटलं आहे. मुंबईहून गोव्याला विमानानं येत असताना तिच्यासोबत हा प्रकार झाल्याचं उर्फीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले. 

उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्फीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. उर्फीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला आवाज नाही. पण त्यात काही मुलं दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत उर्फीनं सांगितलं की मुंबईहून गोव्याला विमानानं जात असताना तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या काही मुलांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. या संपूर्ण प्रकरणाविषयी सांगत उर्फी म्हणाली, ‘मी मुंबईहून गोव्याला जात असताना मला लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला. ते माझे नाव घेत माझ्याबद्दल घाणेरड्या भाषेत बोलत होते. मी त्यांना अडवलं तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितलं की त्याचे मित्र दारूच्या नशेत होते. परंतु, स्त्रीशी गैरवर्तन करण्यासाठी कोणतीही सबब असू शकत नाही. तुम्ही नशेत आहात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही एखाद्या महिलेशी गैरवर्तन कराल. मी एक पब्लिक फिगर आहे, सार्वजनिक मालमत्ता नाही.”

COMMENTS