Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावेडीत सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

अहमदनगर/प्रतिनिधी - रात्रीच्या वेळी घरात कोणी नसताना सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या भावाने बळजबरीने तिच्या मनाविरुद्ध, बळजबरीने शार

भिल्ल समाज स्मशानभूमी अतिक्रमण प्रकरणी कार्यवाही करा
नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यांचे दोन रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन द्याना. सुभाषजी देसाई यांना आ. आशुतोष काळे यांच्या वतीने निवेदन
सादिकच्या मृत्यूचे गूढ वाढले…वरिष्ठांना पाठवला अहवाल ; मुकुंदनगर परिसरात बंदोबस्त वाढवला, चौकशी अहवालाची प्रतीक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी – रात्रीच्या वेळी घरात कोणी नसताना सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या भावाने बळजबरीने तिच्या मनाविरुद्ध, बळजबरीने शारीरिक संबंध केले. त्यामुळे ती मुलगी गरोदर राहिल्याची संताप जनक घटना सावेडी परिसरात घडली.

 या बाबतची माहिती अशी की बाहेरगावाहून नगर येथे पोट भरण्यासाठी आलेले एक कुटुंब सावेडी उपनगरात राहून उपजीविका करत होते. त्या कुटुंबात पती पत्नी सह एक मुलगा व एक 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी एवढेच सदस्य राहतात. त्या मुलीस सहा वर्षांपासून थायरॉईड असल्यामुळे तिच्यावर.औषधोपचार सुरु आहे. दि .20  रोजी त्या मुलीच्या आई वडिलांनी त्या मुलीस तीन महिन्यापासुन मासिक पाळी न आल्यामुळे तिला सिव्हील हॉस्पीटल येथे औषधोपचाराकरीता नेले.

तेथें डॉक्टरांना सांगितले की, तिला थायरॉईडचा प्रॉब्लेम असुन तिला गेले तीन महिन्यापासून मासिक पाळी आली नाही. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्या मुलीस तपासले नंतर काही वेळानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, तुमची मुलगी ही गरोदर असुन तिची सोनोग्राफी केली असता ती 20 आठवडे 2 दिवसाची गरोदर आहे असे त्यांना डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून आई वडिलांच्या पायाखालची  जमीन हादरली. त्यांनतर त्या दांपत्याने मुलीस विश्वासात घेवुन तिच्याकडे असे कृत्य तुझ्यासोबत कोणी केले आहे असे विचारले असता तिने सांगितले की, मार्च महिन्याचे तुम्ही दोघे हरभरा काढण्या करीता गावाकडे शेतावर गेले होते त्यावेळी घरी मी,भाऊ असे दोघेच होतो. रात्री आम्ही जेवण करुन झोपी गेले.त्यावेळी भावाने कोणी नसतांना रात्री  जवळ आला व त्याने बळजबरीने शारिरीक संबंध केले त्या वेळी तिने त्याला तु माझ्यासोबत असे का करतो असे विचारले असता त्याने सांगितले की, काही होत नाही तु झोपुन जा, असे म्हणाला असे सांगितले. त्यांनतर या घटनेची माहिती तोफखाना पोलिसाना मिळाल्याने ते सिव्हील हॉस्पिटलमध्ये आले. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पिडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलीच्या सख्ख्या भावाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.पुढील तपास तोफखाना पोलिस करीत आहे.

COMMENTS